Ambani-Adani
Ambani-Adani Sakal
Personal Finance

Ambani-Adani: दिवाळखोर कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीतून अंबानी आणि अदानी बाहेर

राहुल शेळके

Future Retail: दिवाळखोर कंपनी विकत घेण्यासाठी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्या पहिल्या शर्यतीत सामील होत्या, मात्र आता या दोन्ही कंपन्यांनी दिवाळखोर कंपनी विकत घेण्यापासून आपले पाऊल मागे घेतले आहे. याशिवाय, ते खरेदी करण्यासाठी अंतिम बोली प्रक्रियेत आणखी बऱ्याच कंपन्या सामील आहेत.

एका अहवालात असे म्हटले आहे की मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी समूहाने फ्युचर रिटेल खरेदी करण्यासाठी अंतिम बोली प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

ET Nowच्या अहवालानुसार, फ्युचर रिटेलच्या अंतिम बोली प्रक्रियेसाठी सहा कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या आहेत.

अहवालानुसार, रियल्टी फर्म स्पेस मंत्राने फ्युचर रिटेल खरेदी करण्यासाठी बोली अर्ज सादर केला आहे. त्याच वेळी, फ्युचर रिटेलच्या काही भागांसाठी आणखी पाच जण बोली लावू शकतात.

Pinnacle Air, Palgun Tech LLC आणि Lehar Solutions यांनी कंपनी घेण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. याशिवाय गुडविल फर्निचर आणि सर्वभिष्ट ई-वेस्ट मॅनेजमेंटनेही निविदा सादर केल्या आहेत.

कर्जदारांना किती कोटींचे कर्ज काढायचे आहे?

कंपनी विकत घेण्यासाठी 49 एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आल्याचे अहवालात म्हटले आहे. सर्वप्रथम मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि गौतम अदानी यांच्या समूहाने अर्ज सादर केला होता.

आर्थिक कर्जदारांकडून 20,000 कोटी रुपये उभे करण्याचा दावा करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

23 मार्च 2023 रोजी, फ्यूचर रिटेलच्या कर्जदारांनी Expression of Interest (EOI) आमंत्रित केले होते, जेणेकरून कंपनी खरेदी करण्यासाठी बोली लावता येईल.

रिलायन्ससह 11 कंपन्यांमुळे अंतिम मुदत दोनदा वाढवण्यात आली, परंतु अंतिम बोली देण्यात आली नाही. 4 ऑक्टोबर 2022 रोजी संभाव्य बोलीदारांकडून EOI आमंत्रित करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT