Reliance mukesh ambani Sakal
Personal Finance

Reliance AGM 2023: मुकेश अंबानींच्या रिलायन्सने रचला इतिहास, भरला एवढा टॅक्स

RIL AGM 2023: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली.

राहुल शेळके

RIL AGM 2023: आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ही केवळ देशातील सर्वात मौल्यवान कंपनी नाही तर भारत सरकारला कर भरण्याच्या बाबतीतही ती पुढे आहे. कंपनीने 16,000 कोटींहून अधिक कर भरून नवा विक्रम केला आहे.

सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मुकेश अंबानी यांनी सांगितले की कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात 16,639 कोटी रुपयांचा कर भरला आहे. एजीएममध्ये कंपनीने आपल्या वार्षिक कामगिरीची माहिती दिली आहे. असे वृत्त TV9 ने दिले आहे.

रिलायन्सने कमाई-नफ्याचा विक्रम केला

रिलायन्स इंडस्ट्रीजने 2022-23 मध्ये 9,74,864 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल मिळवला आहे. यामध्ये कर भरण्यापूर्वी कंपनीचा नफा 1,53,920 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, कंपनीचा निव्वळ नफा 73,670 कोटी रुपये झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची आजपर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

रिलायन्सच्या एजीएममध्ये, JIO INFOCOMM चे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की JIO 5G ने अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राला जोडले आहे. जिओ होम सर्व्हिसेस लाँच करताना ते म्हणाले की JIO स्मार्ट होम सेवा वेगाने वाढेल. ब्रॉडबँड सेवेच्या माध्यमातून जिओच्या स्मार्ट होमवर भर दिला जात आहे.

रिलायन्सने Jio True 5G लॅबचीही घोषणा केली आहे. आकाश अंबानी म्हणाले की, आम्ही Jio True5G लॅबची घोषणा करत आहोत, ही सुविधा उद्योग परिवर्तनाला गती देण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

IPL ने GeoCinema वर जागतिक विक्रम केला

रिलायन्सच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी म्हणाले की, प्रथमच IPL JioCinema वर मोफत स्ट्रीम करण्यात आली. याने 450 दशलक्ष दर्शकांच्या उपस्थितीसह जागतिक विक्रम केला.

मुकेश अंबानी म्हणाले की, डिसेंबरपासून ग्राहकांना देशातील प्रत्येक भागात 5G सेवा मिळण्यास सुरुवात होईल. Jio ने 2G फीचर फोन पेक्षा कमी किंमतीत फक्त 999 रुपयांमध्ये 'Jio Bharat' फोन लॉन्च करून भारतातील प्रत्येक घरात मोबाईल आणि 4G पुरवण्याचे काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT