Mukesh Ambani turns to 'Wyzr' to disrupt India's consumer electronics and home appliances market
Mukesh Ambani turns to 'Wyzr' to disrupt India's consumer electronics and home appliances market  Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: अंबानींची नवीन व्यवसायात एन्ट्री! रिलायन्स देणार टाटा, सॅमसंग आणि एलजीला टक्कर; काय आहे प्लॅन?

राहुल शेळके

RIL Consumer Electronics: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी टेलिकॉम आणि रिटेलनंतर आणखी एका क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) नवीन मेड-इन-इंडिया ब्रँड Wyzr सह नवीन उत्पादने बाजारात आणणार आहे. सध्या देशातील टीव्ही, गृहोपयोगी उपकरणे आणि लहान उपकरणांची बाजारपेठ 1.1 लाख कोटी रुपयांची आहे.

यात 60% वाटा LG, Samsung, Whirlpool, Haier आणि Daikinचा आहे. त्याचप्रमाणे टाटा समूहाची कंपनी व्होल्टासचे एसी मार्केटवर वर्चस्व आहे. रिलायन्स डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि मिर्क इलेक्ट्रॉनिक्स या दोन देशांतर्गत कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांशी बोलणी करत आहे. मिर्क इलेक्ट्रॉनिक्स ही इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादक कंपनी ओनिडाची मूळ कंपनी आहे.

रिलायन्सचा काय आहे प्लॅन?

अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स सेगमेंटमध्ये परदेशी कंपन्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्लॅन करत आहे. यासाठी Wyzr ब्रँड अंतर्गत मेड-इन-इंडिया उत्पादने लाँच केली जातील. अंबानींची कंपनी या योजनेअंतर्गत येत्या काही दिवसांत एलईडी बल्ब, टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन इ. उत्पादने बाजारात आणू शकते.

रिलायन्स रिटेलने अलीकडेच व्हिझर या ब्रँड नावाखाली एअर कूलर लाँच केले आहेत. या ब्रँडचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. सध्या, रिलायन्स इंडस्ट्रीज या ब्रँड अंतर्गत टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, एलईडी बल्ब यांसारखी उत्पादने इतर उत्पादकांकडून करारावर बनवेल.

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये रिलायन्स

सध्या, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स विभागात रिलायन्सचा वाटा मर्यादित आहे. 2022 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजने अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सन्मिनाच्या भारतीय युनिटमधील 50.1 टक्के हिस्सा 1,670 कोटी रुपयांना विकत घेतला होता. सन्मिनाचा चेन्नईमध्ये 100 एकरांवर उत्पादन कारखाना आहे.

अधिकृत घोषणा झालेली नाही

मात्र, या योजनेबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यातही या योजनेबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT