Mukesh Ambani’s Jio all set to enter new segment of UPI payments
Mukesh Ambani’s Jio all set to enter new segment of UPI payments Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: पेटीएम संकटात असताना अंबानींची कंपनी करणार UPI क्षेत्रात एन्ट्री; काय आहे प्लॅन?

राहुल शेळके

Jio UPI Payment News: उद्योगपती मुकेश अंबानी UPI क्षेत्रात सुरुवात एन्ट्री करू शकतात. अंबानी जिओ साउंड बॉक्स लॉन्च करण्याचा विचार करत आहे. जिओने रिटेल आउटलेटवर साउंड बॉक्स देणे सुरू केले आहे. या बॉक्सच्या आगमनाने पेटीएम साउंड बॉक्सला आता थेट स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.

जिओ साउंड बॉक्स लवकरच जिओ पे ॲपशी जोडला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओने साउंड बॉक्सची ट्रायलही सुरू केली आहे. सध्या या सेगमेंटमध्ये कोणतेही ॲप लॉन्च करण्यात आलेले नाही.

पेटीएम संकटाचा फायदा होईल?

पेटीएम संकटात असताना मुकेश अंबानींच्या या नव्या साउंड बॉक्सला फायदा होऊ शकतो. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे.

मुकेश अंबानींची कंपनी जिओने टेलिकॉम कंपनीत प्रवेश करताच फ्री कॉलिंग आणि फ्री इंटरनेट सारख्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित केले होते. त्याचप्रमाणे, आता असा अंदाज लावला जात आहे की जिओ जबरदस्त ऑफर्स देऊन UPI ​​मार्केट काबीज करू शकेल.

'या' कंपन्या आधीच UPI क्षेत्रात

सध्या फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन पे, पेटीएम आणि फ्लिपकार्ट या कंपन्या UPI सेवा देत आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने अलीकडेच ॲक्सिस बँकेसोबत संयुक्त UPI सेवा सुरू केली आहे. (Mukesh Ambani’s Jio all set to enter new segment of UPI payments)

फ्लिपकार्टनेही आपली UPI सेवा सुरू केली आहे

अलीकडेच आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनेही आपली UPI सेवा सुरू करण्याची घोषणा केली. कंपनीने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने आपले UPI हँडल (@fkaxis) लाँच केले होते. (Jio Upi Payment Soundbox May Enter In Upi Market Paytm Phonepe Google Pay)

डिजिटल पेमेंट सेवेत प्रवेश करून कंपनी आपल्या ग्राहकांना अधिक सुविधा देणार आहे. सध्या, Flipkart UPI फक्त Android ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्याच्या मदतीने ग्राहक थेट फ्लिपकार्ट ॲपवरून पेमेंट करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT