elon musk  sakal
Personal Finance

Elon Musk: इलॉन मस्कची मोठी घोषणा; ट्विटरवर बातम्या वाचण्यासाठी मोजावे लागतील पैसे

इलॉन मस्कने ट्विट केले की आता वापरकर्त्यांना प्रति लेखाच्या आधारावर शुल्क भरावे लागेल.

राहुल शेळके

Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी शनिवारी युजर्सना एक मोठा धक्का दिला आहे. मस्कने ट्विट केले की आता वापरकर्त्यांना प्रति लेखाच्या आधारावर शुल्क भरावे लागेल.

यासह, जर वापरकर्त्यांनी मासिक सदस्यत्वासाठी साइन अप केले नाही तर त्यांना लेख वाचण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

मस्क म्हणाले- बर्‍याच लोकांसाठी हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनेल आणि त्यांना तुमच्यासाठी (वापरकर्ते) चांगली माहिती तयार करण्यासाठी अधिक वेळ घालवण्यास भाग पाडेल.

याआधी मस्कने व्हेरिफाईड अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली होती. मस्कने म्हटले होते की जे वापरकर्ते ब्लू टिकसाठी पैसे देत नाहीत त्यांना ब्लू टिक मिळणार नाही.

इलॉन मस्कने 12 एप्रिलला ब्लू टिकबद्दल ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी सांगितले की, 20 एप्रिलपासून व्हेरिफाईड अकाउंटमधून लीगेसी ब्लू टिक मार्क हटवला जाईल. मस्कने आधीच जाहीर केले होते की जर ब्लू टिक लावायची असेल तर त्यासाठी मासिक शुल्क भरावे लागेल.

माध्यम प्रकाशकांना शुल्क आकारण्याची परवानगी असेल:

आता शनिवारी इलॉन मस्क यांनी ट्विट केले आणि सांगितले की पुढील महिन्यापासून ट्विटर मीडिया प्रकाशकांना त्यांचे लेख वाचण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क आकारण्याची परवानगी देईल.

वापरकर्त्यांना 'प्रति लेख आधारावर' शुल्क आकारले जाईल आणि जर त्यांनी मासिक सदस्यतेसाठी साइन अप केले नाही तर अधिक पैसे मोजावे लागतील. ते म्हणाले की सर्व उत्पन्न माहिती निर्मात्यांना जाईल.

मस्क म्हणाले की, जे वापरकर्ते मासिक सबस्क्रिप्शनसाठी साइन अप करणार नाहीत आणि अधूनमधून लेख वाचू इच्छितात त्यांना प्रति लेख जास्त किंमत मोजावी लागेल. प्रसारमाध्यम संस्था आणि जनता या दोघांसाठी हा मोठा विजय आहे, असे ते म्हणाले.

ब्लू टिकसाठी नवीन नियम:

जर एखाद्या वापरकर्त्याला ब्लू टिक हवी असेल किंवा आधीच मिळालेली ब्लू टिक टिकवून ठेवायची असेल, तर त्याला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरू होते. मोबाईल वापरकर्त्यांसाठी ते दरमहा 900 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT