mutual fund invest sip market condition share market Sakal
Personal Finance

‘क्वांट’च्या निमित्ताने...

सर्वसामान्य गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता वाढत आहे आणि ते बँकेसारख्या पारंपरिक गुंतवणुकीकडून म्युच्युअल फंडाकडे वळत आहेत.

सुहास राजदेरकर

म्युच्युअल फंड योजना बाजारातील जोखमीवर अवलंबून असतात, याची जाणीव गुंतवणूकदारांना असते. परंतु, त्या म्युच्युअल फंडाच्या कार्यालयीन कारभारातील जोखमीवर अवलंबून नसाव्यात, अशी गुंतवणूकदारांची माफक अपेक्षा असते आणि ती रास्तच आहे.

आज सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास वाढत आहे. महिना तब्बल २०,००० कोटी रुपयांची ‘एसआयपी’ हे त्याचेच द्योतक आहे, ज्यामध्ये मोलमजुरी, घरकाम करून पोट भरणाऱ्यांचासुद्धा महिना १०० ते २००० रुपयांचा वाटा आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता वाढत आहे आणि ते बँकेसारख्या पारंपरिक गुंतवणुकीकडून म्युच्युअल फंडाकडे वळत आहेत. यामागे ‘सेबी’चे भांडवली बाजारावरील काटेकोर लक्ष, म्युच्युअल फंडांविषयी वाढती जागरूकता, माहिती आणि ज्ञान; तसेच मागील ४० ते ४५ महिन्यांमध्ये शेअर बाजारात म्हणावी तशी घसरण झाली नाही, ज्यामुळे ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ (फोमो) वाढतो आहे.

म्हणजेच या परताव्याच्या तेजीच्या लाटेत आपण कोरडे राहण्याची भीती, ही मुख्य कारणे आहेत. अशा वेळी म्युच्युअल फंडांकडून एकच अपेक्षा आहे, की त्यांनी ‘सेल्फ गोल’ करू नये. भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने नुकतीच क्वांट म्युच्युअल फंडाच्या कार्यालयांची झाडाझडती घेतली. कोणाची आणि नक्की काय चूक होती? त्याबद्दलची माहिती यथावकाश चौकशीअंती समजेलच. परंतु, जे काही चर्चेत आहे ते म्हणजे ‘फ्रंट रनिंग’; तसेच इतर काही प्रक्रियांचे उल्लंघन.

‘फ्रंट रनिंग’ म्हणजे काय?

समजा, एखाद्या म्युच्युअल फंडाला एखाद्या कंपनीचे दोन लाख शेअर खरेदी करायचे आहेत. ते खरेदी करण्यापूर्वी म्युच्युअल फंडामधील काही कर्मचारी (ज्यांना या खरेदीच्या निर्णयाची माहिती आहे) असे शेअर स्वतःसाठी खरेदी करतात. नंतर म्युच्युअल फंडाने खरेदी केली, की आपोआपच मागणीमुळे शेअरचे भाव वर जातात आणि कर्मचारी त्यांचे शेअर विकतात, ज्यामध्ये त्यांना या माहितीचा मोठा फायदा होतो, असे ‘फ्रंट रनिंग’ भारतामध्ये; तसेच इतर देशांमध्ये बेकायदेशीर आहे.

गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी?

  • बहुतेक गुंतवणूकदार ‘डू इट युवरसेल्फ’ अर्थात, स्वतः गुंतवणूकनिर्णय घेतात आणि तसे करताना मागील एका वर्षांमध्ये कोणत्या योजनेने सर्वांत जास्त परतावा दिला आहे, हे पाहतात. परंतु, तो परतावा मिळविण्यासाठी त्या म्युच्युअल फंडाने घेतलेल्या जोखमीकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात.

  • योजनेची मालमत्ता किती आहे, दीर्घकाळासाठी कामगिरी कशी आहे, योजना किती जुनी आहे, योजनेचे व्यवस्थापक किती अनुभवी आहेत, विविध तांत्रिक रेशो म्हणजे टर्नओव्हर, अल्फा, बीटा माहित असणेही महत्त्वाचे आहे.

  • अनेकदा परतावा जास्त देण्याच्या मोहामध्ये काही म्युच्युअल फंड मोमेंट्म किंवा टॅक्टिकल ट्रेडिंग करताना दिसतात. म्हणजे काही विशिष्ट माहितीच्या आधारे, अतिशय कमी काळामध्ये शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करणे. यामध्ये निर्णय चुकला, तर मोठी जोखीम असते. ज्यांची जोखीम घेण्याची क्षमता नसेल, त्यांनी अशा म्युच्युअल फंडांपासून लांब राहणे इष्ट.

  • गुंतवणूक विभागून करावी. तीन ते चार म्युच्युअल फंडांच्या सहा ते सात योजनांमध्ये विभागून केलेल्या गुंतवणुकीमुळे जोखीम कमी होते.

  • प्रत्येकाची जोखीम घेण्याची क्षमता, वय, उत्पन्न, उद्देश, निवृत्तीला राहिलेली वर्षे, जबाबदाऱ्या, खर्च वेगवेगळे असतात. त्यामुळे तुमच्यासाठी कोणती योजना अनुकूल आहे, ते तपासून गुंतवणूक करा.

  • वरील सर्व गोष्टींचे ज्ञान आणि माहिती नसेल किंवा ती मिळवण्यासाठी वेळ नसेल, तर अनुभवी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करणे योग्य.

क्वांट म्युच्युअल फंड

  • एकूण योजना : २१

  • २०१९ मध्ये एकूण मालमत्ता : १६६ कोटी रुपये

  • २६ जून २०२४ अखेर एकूण मालमत्ता : ८८,२७० कोटी रुपये

  • भारतात फक्त दोन कार्यालये आणि मोजके कर्मचारी

  • शेअर खरेदी-विक्रीची अतिशय आक्रमक शैली

  • लार्ज कॅप टर्नओव्हर रेशो फेब्रुवारीमध्ये : ५५७ टक्के

  • (भारतातील सर्व म्युच्युअल फंड इक्विटी योजनांमध्ये सर्वांत जास्त)

  • बहुतेक सर्व इक्विटी योजनांवर एका वर्षात कमीतकमी ५० टक्के परतावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT