Mutual Funds
Mutual Funds sakal
Personal Finance

Mutual Funds : मल्टिअ‍ॅसेट गुंतवणुकीचे महत्त्व

सकाळ वृत्तसेवा

अश्‍विन शहा

पश्‍चिम आशियातील ताज्या संघर्षामुळे सध्या सुरू असलेला भू-राजकीय तणाव आणखी वाढला असून, गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूक कशी करावी, असा त्यांना संभ्रम पडला आहे. यावर एक उत्तम उपाय आहे तो म्हणजे मल्टिअ‍ॅसेट गुंतवणूक करणे.

यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली

मल्टि-अ‍ॅसेट गुंतवणूक ही यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली आहे. या नावातूनच याचे स्वरूप अगदी स्पष्ट होते. मल्टिअॅसेट गुंतवणूक म्हणजे विविध मालमत्ता वर्गांमध्ये केलेली गुंतवणूक. ही रणनीती सार्वकालीन असली, तरी अनिश्चित काळात तिचे महत्त्व अनेकपटींनी वाढते. शेअर, रोखे, सोने आणि रिअल इस्टेट यांसारख्या विविध मालमत्तावर्गांचे स्वतःचे वेगळे बाजारपेठ चक्र, मूल्यांकन निर्देशांक आणि उत्पन्न व जोखीम गुणोत्तर असते. ही वस्तुस्थिती असली, तरी दीर्घकालीन कमाल परतावा मिळविण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये मालमत्ता वैविध्य असणे महत्त्वाचे ठरते.

नांदेड येथील म्युच्युअल फंड वितरक भारत दायमा म्हणाले, की मल्टिअॅसेट गुंतवणुकीच्या पद्धतीतून गुंतवणूकदारांना सर्व मालमत्ता वर्गांचे फायदे मिळविण्यात मदत होते; तसेच मालमत्तांमधील एकवटलेली जोखीम दूर राहते. उदाहरणार्थ, मल्टिअॅसेट गुंतवणुकीमुळे हे सुनिश्चित होते, की गुंतवणूकदार शेअर बाजारातील उच्च वाढीच्या लाभांपासून वंचित राहणार नाहीत आणि त्याचवेळी कर्जरोख्यांसारख्या स्थिर मालमत्ता प्रकारांत गुंतवणूक केल्याने संतुलन साधले जाईल. याशिवाय, सोने हे महागाईविरूद्ध भरभक्कम आधार प्रदान करते, तर रिअल इस्टेटमधील गुंतवणूक अतिरिक्त उत्पन्नाचा लाभ देते. परिणामी, परतावा कमाल पातळीवर राहतो आणि एकवटलेल्या जोखमींच्या धक्क्यांपासून बचाव होतो.

मल्टिअ‍ॅसेट म्युच्युअल फंड

मल्टिअ‍ॅसेट गुंतवणुकीत प्रवेश मिळविण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे मल्टिअॅसेट म्युच्युअल फंड. हा हायब्रीड श्रेणीतील गुंतवणूक पर्याय असून, त्यामध्ये गुंतवणूकदाराला एकाच फंडात तीन किंवा अधिक मालमत्ता वर्गांमध्ये प्रवेश मिळतो. अशा फंडांचे व्यावसायिक व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार वितरण बदलण्याची त्यांची क्षमता यामुळे गुंतवणूकदारांचा वेळ आणि ऊर्जा वाचते.

मल्टिॲसेट श्रेणीतील एक सर्वांत जुना फंड म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टिअॅसेट म्युच्युअल फंड. या फंडाचा २१ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि त्याने आपल्या गुंतवणूकदारांना नेहमीच चांगला परतावा दिला आहे. याच्या स्थापनेच्या वेळी १० लाख रुपयांची असलेली गुंतवणूक आता ५.५ कोटी रुपयांची असेल.

(लेखक पेलिकन इन्व्हेस्टमेंट लि.चे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, India vs Ireland: टीम इंडियाची विजयी सलामी, आयर्लंडला केलं चारीमुंड्या चीत; कर्णधार रोहितचे शानदार अर्धशतक

Rohit Sharma: रोहितचा टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम; विराट-बाबरच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Mahesh Gaikwad : कल्याण पूर्वचे महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

Modi Cabinet: श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, धर्यशील मानेंना केंद्रात मंत्रीपदं मिळणार - सूत्र

INDIA vs NDA: मोदींना सत्तेतून खेचणार? ही तर लोकांची ईच्छा, योग्य वेळी पाऊले उचलणार; सत्तास्थापनेबाबत खर्गे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT