Narayana Murthy gifts four-month-old grandson shares worth Rs 240 crore in Infosys  Sakal
Personal Finance

Narayana Murthy: 4 महिन्यांचा नातू बनला 240 कोटींचा मालक; नारायण मूर्तींनी गिफ्ट केले इन्फोसिसचे शेअर्स

Narayana Murthy Infosys: भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे अनेकदा चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी भारतीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता.

राहुल शेळके

Narayana Murthy Infosys: भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे अनेकदा चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी भारतीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. आज नारायण मूर्ती यांनी त्यांचा चार महिन्यांचा नातू एकग्रह रोहन मूर्ती यांना 240 कोटी रुपयांच्या शेअर्समध्ये हिस्सा देऊन भारतातील सर्वात तरुण करोडपती बनवले.

बीएसई फाइलिंगनुसार, भारतातील सर्वात तरुण करोडपती बनलेल्या एकग्रहचे इन्फोसिस कंपनीत 15 लाख शेअर्स आहेत. यासह, एकाग्रह आता इन्फोसिसमध्ये 0.04 टक्के भागीदारी झाला आहे. (Narayana Murthy gifts four-month-old grandson shares worth Rs 240 crore in Infosys)

इन्फोसिसच्या शेअर्समध्ये आज घसरण झाली. दुपारी 3:20 वाजता कंपनीचे शेअर्स 2.05 टक्क्यांनी घसरून 1601.40 रुपयांवर व्यवहार करत होते. असे मानले जात आहे की विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) मोठ्या प्रमाणात शेअर्स विकत आहेत, ज्याचा परिणाम आयटी शेअर्सवर देखील दिसून येईल.

नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांना दोन मुले आहेत. एक मुलगा रोहन मूर्ती आणि मुलगी अक्षता मूर्ती, ज्यांचे पती इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक आहेत. एकग्रह रोहन मूर्ती हा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म नोव्हेंबर 2023 मध्ये झाला होता.

सुधामूर्ती राज्यसभेच्या खासदार झाल्या

एकग्रह रोहन मूर्ती यांच्या आजी आणि नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. ते राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले खासदार आहेत.

याशिवाय, त्या आधीच भारतातील एक प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी Wise and Otherwise: A salute to Life and Here, there and Everywhere सारखी खूप प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत.

एकग्रहचा अर्थ काय?

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नारायण आणि सुधा मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि त्यांची पत्नी अपर्णा कृष्णन यांच्या पोटी या मुलाचा जन्म झाला. त्याला एकग्रह असे नाव देण्यात आले. हे नाव महाभारतातील अर्जुनाच्या एकाग्रहावरून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. एका विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे याला एकग्रह म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT