NCLAT fine imposed on Google by competition watchdog upholds Rs 1,337.76 Crore
NCLAT fine imposed on Google by competition watchdog upholds Rs 1,337.76 Crore  Sakal
Personal Finance

Google Fined: गुगलला मोठा धक्का! 30 दिवसांत द्यावा लागणार 1338 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

NACLT Fined Google: जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) ने गुगलवर लावण्यात आलेला दंड कायम ठेवला आहे. CCI म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला 1338 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

अँड्रॉइड ट्रस्ट प्रकरणाबाबत हा दंड ठोठावण्यात आला आहे. NCLAT ने Google ला निर्देश दिले आहेत की 30 दिवसांच्या आत Google ला 1338 कोटींचा दंड भरावा लागेल.

Google वर अँड्रॉइड मोबाईल डिव्‍हाइस क्षेत्रातील वर्चस्वाचा गैरवापर करून स्पर्धेत अडथळा आणण्‍यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. सीसीआयने आपल्या आदेशात म्हटले होते की, गुगलने आपल्या मजबूत स्थान आणि वर्चस्वाने MADA करारांचे उल्लंघन केले आहे.

गुगलने या करारांचे उल्लंघन केले आहे आणि आपल्या मजबूत स्थानाचा आणि वर्चस्वाचा गैरफायदा घेतला आहे, असे भारतीय स्पर्धा आयोगाचे मत आहे.

2019 पासून तपास सुरू :

2019 पासून, Google ला Android मोबाइल डिव्हाइस क्षेत्रातील वर्चस्वाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

एप्रिल 2019 मध्ये, देशातील Android-आधारित स्मार्टफोन वापरकर्त्यांनी Google च्या वर्चस्वाचा स्थितीचा गैरवापर केल्याबद्दल तक्रार केल्यानंतर CCI ने Google विरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते.

NCLAT ने आपल्या निर्णयात काय म्हटले?

न्यायालयाने एनसीएलएटीला या अपीलवर 31 मार्चपर्यंत अंतिम निकाल देण्यास सांगितले होते. आपली बाजू मांडताना गुगलने सांगितले की, त्याच्या वतीने करण्यात येणारा करार चुकीचा नाही.

कारण उपकरणांमध्ये इतर अॅप्स इन्स्टॉल करण्याशी संबंधित कोणतेही बंधन नाही. मात्र, निकाल कंपनीच्या बाजूने लागला नाही आणि त्यावर लावण्यात आलेला दंड कायम ठेवण्यात आला.

वर्षाच्या सुरुवातीला, 4 जानेवारी रोजी, NCLAT च्या दुसर्‍या खंडपीठाने Google च्या आवाहनासंदर्भात नोटीस पाठवताना कंपनीला एकूण 1,337 कोटी रुपयांच्या दंडाच्या 10 टक्के रक्कम भरण्यास सांगितले.

मात्र, त्यावेळी कंपनी अंतिम सुनावणी आणि अंतिम निर्णयाची वाट पाहत असल्याचे सांगत गुगलने नकार दिला होता. गुगलवर सातत्याने आरोप होत आहेत की ते इतर कंपन्यांना बाजारात स्थान मिळवण्याची संधी देत ​​नाही आणि यूजरबेस राखण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT