केंद्र सरकार 12% आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करून वस्तू व सेवांना कमी कर श्रेणीत आणण्याचा विचार करत आहे.
अन्नधान्य, कपडे, सिमेंट आणि ब्युटी सर्व्हिसेसवर करकपात होऊ शकते.
जीएसटी कौन्सिलची बैठक 3-4 सप्टेंबरला असून दिवाळीपूर्वी ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
GST Reform: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लालकिल्ल्यावरून जीएसटी सुधारणा (GST Reforms) जाहीर केल्या होत्या. त्यानंतर 20 व 21 ऑगस्टला दिल्लीमध्ये झालेल्या ग्रुप-ऑफ-मिनिस्टर्स (GoM) च्या बैठकीत केंद्राने सुचवलेला 12% आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
नवीन माहितीनुसार, केंद्र सरकार अन्नधान्य आणि कापड यांना थेट 5% जीएसटी स्लॅबमध्ये आणण्याचा विचार करत आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवरील कराचा बोजा हलका होईल. काही मूलभूत सेवांवर देखील 18% वरून 5% जीएसटी करण्याचा विचार केला जात आहे. हा मुद्दा सप्टेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत चर्चिला जाणार आहे.
सरकार सिमेंटवरील जीएसटी 28% वरून 18% करण्याचा प्रस्ताव मांडू शकते. यामुळे बांधकाम व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल. तसेच सध्या 18% जीएसटी असलेल्या मिड व हाय कॅटेगरी सलून- ब्युटी पार्लर सेवांवर करकपात करण्याचा विचार आहे.
सध्या नॉन-ब्रँडेड मिठाईंवर 5% आणि ब्रँडेड/पॅकेज्ड मिठाईंवर 18% जीएसटी लागू आहे. कार्बोनेटेड ड्रिंक्सही या स्लॅबमध्ये येतात. कपड्यांबाबत बोलायचे झाले तर 1,000 रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर 5% आणि त्यापेक्षा जास्त किंमतीच्या कपड्यांवर 12% जीएसटी आहे.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची 56वी बैठक 3-4 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याआधी 2 सप्टेंबरला अधिकाऱ्यांची तयारी बैठक होईल. मात्र, नवीन कर संरचनेमुळे केंद्र व राज्यांच्या महसुलात सुमारे 40,000 कोटी रुपयांची घट होण्याचा अंदाज आहे.
सरकारशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, करकपातीचे हे निर्णय दसरा-दिवाळीपूर्वी लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. यामुळे ग्राहक आणि व्यवसायिकांना "दिवाळी गिफ्ट" मिळू शकते.
प्र.1: नवीन जीएसटी सुधारणा कधी लागू होणार?
उ: सप्टेंबरमधील जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर दिवाळीपूर्वी लागू होण्याची शक्यता आहे.
प्र.2: कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक परिणाम होईल?
उ: अन्नधान्य, कपडे, सिमेंट, ब्युटी पार्लर सेवा आणि काही मूलभूत सेवांवर करकपात होऊ शकते.
प्र.3: सध्याच्या जीएसटी स्लॅबमध्ये काय बदल सुचवले आहेत?
उ: 12% आणि 28% स्लॅब हटवून, बहुतांश वस्तूंना 5% किंवा 18% स्लॅबमध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे.
प्र.4: महसुलावर याचा काय परिणाम होईल?
उ: केंद्र व राज्य सरकारांना अंदाजे 40,000 कोटी रुपयांच्या महसुलाचा तोटा सहन करावा लागू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.