Reliance-Disney India Sakal
Personal Finance

Nita Ambani: मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीचे नेतृत्व करणार नीता अंबानी? मिळू शकते मोठी जबाबदारी

Reliance-Disney India: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्या विलीनीकरणाची घोषणा आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा म्हणजे 28 फेब्रुवारीला अपेक्षित आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांनी भारतातील त्यांच्या मीडिया ऑपरेशन्सच्या विलीनीकरणासाठी करार केला आहे.

राहुल शेळके

Reliance-Disney India: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्या विलीनीकरणाची घोषणा आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा म्हणजे 28 फेब्रुवारीला अपेक्षित आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तात एका सूत्राच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, रिलायन्सच्या या विलीनीकरणावर स्थापन होणाऱ्या संस्थेच्या नवीन अध्यक्षाचे नाव रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी असू शकतात.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांनी भारतातील त्यांच्या मीडिया ऑपरेशन्सच्या विलीनीकरणासाठी करार केला आहे. दोन्ही बाजूंनी अलीकडेच संभाव्य संयुक्त उपक्रमावर चर्चा केली होती. ज्यामध्ये RIL ला बहुसंख्य हिस्सा मिळेल. म्हणजेच विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या नवीन कंपनीचे मालकी हक्क मुकेश अंबानी यांच्याकडे असतील. नव्या कंपनीत रिलायन्सकडे 51 टक्के आणि डिस्नेकडे 49 टक्के हिस्सेदारी असेल.

लंडनमध्ये डील फायनल झाली

डिस्नेचे कार्यकारी केविन मेयर आणि रिलायन्सचे मनोज मोदी या डीलमध्ये सहभागी होते. लंडनमध्ये हा करार झाला आहे. RIL बहुसंख्य भागभांडवलांसाठी रोख पैसे देण्याची शक्यता आहे. या डीलमध्ये जिओ सिनेमाचाही समावेश होणार आहे.

'या' मनोरंजन आणि मीडिया कंपन्यांशी थेट स्पर्धा

हे विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्वात मोठी मनोरंजन आणि मीडिया कंपनी तयार होईल. नवीन कंपनी झी एंटरटेनमेंट आणि सोनी सारख्या मोठ्या टीव्ही प्लेयर्सशी थेट स्पर्धा करेल.

1-1.5 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची शक्यता

हा करार डिस्नेसाठी फायदेशीर ठरू शकतो. नोव्हेंबरमध्ये, इगर म्हणाले की डिस्नेच्या दूरचित्रवाणी वाहिन्या भारतात चांगली कामगिरी करत आहेत तर व्यवसायाच्या इतर भागांचे नुकसान होत आहे. कंपनी पर्याय पाहत आहे, कंपनी भारतात राहून आपले हात मजबूत करण्याचा, नफा सुधारण्याचा प्रयत्न करेल, असे ते म्हणाले होते. दोन्ही कंपन्या सुमारे 1-1.5 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT