G20 Summit 2023 Sakal
Personal Finance

G20 Summit 2023: अंबानी-अदानींसह 500 उद्योगपती G20 मध्ये होणार सहभागी? PIB Fact Checkने सांगितले सत्य

G20 Summit 2023: G20 परिषदेची सर्व तयारी पुर्ण झाली आहे.

राहुल शेळके

G20 Summit 2023: G-20 परिषदेसाठी देशाची राजधानी दिल्लीत जोरदार तयारी सुरू आहे. 9 आणि 10 सप्टेंबरला होणाऱ्या या G20 परिषदेची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. G20 परिषदेसाठी 'स्पेशल डिनर'साठी देशातील मोठ्या व्यावसायिकांना आमंत्रित करण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले होते. पीआयबी फॅक्ट चेकने ही बातमी दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे.

सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या खुलाशानुसार, कोणत्याही व्यावसायिकाला डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. ही बातमी पूर्णपणे खोटी आणि चुकीची आहे. रॉयटर्सच्या बातमीत असे म्हटले होते की मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह भारतातील श्रीमंत उद्योगपती शनिवारी राजधानीत डिनरसाठी G20 मध्ये सामील होतील.

काय बातमी होती?

सूत्रांच्या हवाल्याने, रॉयटर्सच्या बातमीत म्हटले होते की, आमंत्रित केलेल्या 500 व्यावसायिकांमध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, अब्जाधीश कुमार मंगलम बिर्ला, भारती एअरटेलचे संस्थापक-अध्यक्ष सुनील मित्तल, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष आहेत.

पीआयबी फॅक्ट चेकने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली

हा दावा खोटा असल्याची माहिती पीआयबी फॅक्ट चेकने एका पोस्टद्वारे दिली आहे. 9 सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे होणाऱ्या G20 डिनरमध्ये कोणत्याही व्यावसायिकाला आमंत्रित केले जाणार नाही. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत हँडलद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली.

कोण उपस्थित राहणार?

चीनची अर्थव्यवस्था वेगाने मंदीकडे वाटचाल करत असताना आणि अमेरिकेसोबतचे व्यापार युद्ध शिगेला पोहोचले असताना G-20 परिषद भारतासाठी महत्त्वाची आहे.

या परिषदेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे नवी दिल्लीत होणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT