no country to able to take govt benefits to citizens than india says bill gates  Sakal
Personal Finance

Bill Gates: जगात कोणालाच जमलं नाही ते भारताने केले.. का केले बिल गेट्सने मोदी सरकारचे कौतुक?

Bill Gates Meets PM Modi: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्याआधी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीत गेले आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

राहुल शेळके

Bill Gates Meets PM Modi: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्याआधी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीत गेले आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बिल गेट्स हे इनोव्हेशन फॉर पब्लिक गुड या विषयावर विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी आले होते. संबोधनात बिल गेट्स यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक हितासाठी करण्यास प्रोत्साहित केले.

पीएम मोदी बिल गेट्स यांच्या भेटीसाठी खूप उत्सुक दिसत होते. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बिल गेट्सचे कौतुक केले आणि लिहिले की आमची भेट खूप छान होती. गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या भेटीव्यतिरिक्त बिल गेट्स यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली. भेटीदरम्यान दोघांनी एकमेकांना एक पुस्तक भेट दिले.

बिल गेट्स म्हणाले,"कोणताही देश भारतापेक्षा सरकारी लाभ घेण्यास आणि ते कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास सक्षम नाही," पीएम मोदींसोबतचे त्यांचे फोटो शेअर करताना बिल गेट्स यांनी लिहिले, त्यांना भेटणे नेहमीच प्रेरणादायी असते. आणि चर्चा करण्यासाठी खूप काही होते. आम्ही सार्वजनिक हितासाठी AI बद्दल बोललो. (No country to able to take govt benefits to citizens than india says bill gates)

बिल गेट्स यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काय म्हणाले?

भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत बिल गेट्स म्हणाले की, या देशात एआयचे बरेच काम केले जात आहे. तुमच्याकडे आयआयटी ग्रुप्स आहेत ज्यात अत्याधुनिक सुविधा आहेत. आणि जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स गरीब लोकांच्या आरोग्यासाठी आणि शेतीसाठी मदत करेल, तेव्हा आमचे फाउंडेशन त्यांना मदत करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT