Nokia layoffs Company will slash up to 14,000 jobs  Sakal
Personal Finance

Nokia layoffs: गुगलनंतर आता नोकिया करणार कर्मचारी कपात, 14 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Nokia layoffs: गुगलनंतर आता नोकिया कंपनीकडून कर्मचारी कपात, 14 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

राहुल शेळके

Nokia layoffs: नोकिया कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या कमाईत घसरण झाल्यानंतर खर्च कमी करण्याच्या योजनेचा भाग म्हणून 14,000 नोकऱ्या कमी होतील असे कंपनीने गुरुवारी सांगितले. कंपनीने 2026 पर्यंत 800 दशलक्ष युरो ते 1.2 अब्ज युरो पर्यंतची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

नोकिया 20% कर्मचारी कमी करणार

रॉयटर्सच्या अहवालानुसार, फिनिश टेलिकॉम गियर ग्रुप नोकिया (NOKIA.HE) ने गुरुवारी सांगितले की उत्तर अमेरिकेसारख्या बाजारपेठांमध्ये 5G उपकरणांच्या कमी झालेल्या विक्रीमुळे महसुलात मोठी घसरण झाली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, विक्रीत 20% घसरण झाली आहे आणि या घसरणीनंतर बचत योजनेअंतर्गत 14,000 नोकऱ्या कमी केल्या जातील. नोकियाच्या या निर्णयामुळे, कंपनीच्या सध्याच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांची संख्या 72,000 पर्यंत कमी होईल.

उत्तर अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत कंपनीसमोर अनेक आव्हाने असताना नोकियाने कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क म्हणाले की कंपनीतील प्रत्येक कर्मचारी अतिशय हुशार असून कपातीनंतर त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले. त्यांनी खर्च कमी करण्यासाठी कपात करणे गरजेचे होते असे ते म्हणाले.

कंपनीचे सीईओ म्हणाले की क्लाउड कॉम्प्युटिंग आणि एआयच्या युगात, गुंतवणूकीशिवाय यश प्राप्त होणार नाही. ते म्हणाले की, बाजारातील रिकव्हरीबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही परंतु कंपनी धोरणात्मक पातळीवर काम करत आहे.

गेल्या काही महिन्यांत मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि ट्विटरसह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत आणखी कर्मचारी कपात होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT