Ola Cabs shuts down international ventures, shifts focus to Indian market Sakal
Personal Finance

Ola Cabs: 'ओला'चा मोठा निर्णय! 'या' ठिकाणची सेवा करणार बंद; कर्मचाऱ्यांना पाठवली नोटीस

Ola Cabs: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह भारतातील एकूण 250 शहरांमध्ये कॅब सेवा पुरवणाऱ्या ओला कॅबने आंतरराष्ट्रीय व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. अहवालानुसार, 12 एप्रिल रोजी Ola कॅब ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध नसतील.

राहुल शेळके

Ola Cabs: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह भारतातील एकूण 250 शहरांमध्ये कॅब सेवा पुरवणाऱ्या ओला कॅबने आंतरराष्ट्रीय व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. अहवालानुसार, 12 एप्रिल रोजी Ola कॅब ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय बंद करणार आहे. यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे.

भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ओला कॅब्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश केला होता. परंतु कंपनीला प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे ती भारतातच आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. (Ola Cabs shuts down international ventures, shifts focus to Indian market)

ओला आंतरराष्ट्रीय बाजारातून बाहेर पडण्याचे कारण काय?

Ola Cabs इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आपला व्यवसाय बंद करणार आहे. तसेच भारतातील सरकारचे लक्ष सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे, अशा परिस्थितीत ओलाला या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायचे आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्येही उतरण्याची कंपनीची योजना आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात फर्मच्या प्रवक्त्याचा हवाला देत म्हटले आहे की, येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा आहे, ज्यामध्ये भारतात वैयक्तिक वाहनांसह कॅब व्यवसायाच्या विस्तारासाठी मोठ्या संधी आहेत. यावर लक्ष केंद्रित करून, कंपनीने आपल्या प्राधान्यक्रमांचा विचार केला आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनीकंट्रोलने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहने पूर्णपणे इलेक्ट्रिक बनवण्यासाठी कंपनीवर दबाव वाढत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही कॅब कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र होत आहे. ओला कॅबला त्यांच्या सर्व कॅबचे EV (इलेक्ट्रिक वाहन) मध्ये रूपांतर करण्यासाठी गुंतवणूक दुप्पट करावी लागेल, असे अहवालात म्हटले आहे.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, ओला कॅबद्वारे दरवर्षी 1 अब्जाहून अधिक बुकिंग प्राप्त होतात, ज्यासाठी 15 लाखांहून अधिक चालक भागीदार काम करतात. कंपनीने असेही सांगितले की 7,000 पेक्षा जास्त कर्मचारी त्यांच्या कॅब विभागासाठी काम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT