olx house furniture online selling be alert fraud crime police Sakal
Personal Finance

घरगुती फर्निचर ऑनलाईन विकताना...

भाबडा इंजिनिअर १५ हजार रुपयांना बेड विकला गेला, या भावनेत खूप खूष झाला. रट्याने या त्याच्या भाबड्या खुशीचा फायदा घेत तब्बल ६८ लाख रुपये लुबाडले.

सकाळ वृत्तसेवा

- शिरीष देशपांडे

आपल्याकडील चांगल्या वस्तू भंगारभावात विकण्यापेक्षा ऑनलाइन विकल्या जातात. यामुळे भंगारभावापेक्षा चांगली किंमत मिळू शकते, हे जरी खरे असले, तरी याच गोष्टीचा फायदा घेऊन काही मंडळी अशा वस्तू विकणाऱ्याला गंडवताना दिसतात. आता हे कसे होते, ते पाहू.

बंगळुरूमधील एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरने आपला वापरलेला बेड विकायची जाहिरात ‘ओएलएक्स’च्या (OLX) जुने सामान विक्रीच्या साईटवर टाकली. त्याला संध्याकाळी एका व्यक्तीचा फोन आला, त्याने जाहिरात पाहिली होती.

त्याचा फर्निचरचा व्यवसाय होता आणि त्याला विक्रीला असलेला तो बेड घेण्यात रस होता. डिजिटल पेमेंट माध्यमातून पैसे देण्यासाठी त्याने यूपीआय आयडी घेतला. भाबडा इंजिनिअर १५ हजार रुपयांना बेड विकला गेला, या भावनेत खूप खूष झाला. मात्र, चोरट्याने या त्याच्या भाबड्या खुशीचा फायदा घेत तब्बल ६८ लाख रुपये लुबाडले.

भामट्याने त्याला सांगितले, की तुमच्या (इंजिनिअरच्या) खात्यात पैसे जात नाहीत, तुम्हीच पाच रुपये ट्रान्स्फर करा. त्यानंतर चोरट्याने १० रुपये परत केले. परत चोरट्याने सांगितले, की पैसे ट्रान्स्फर होत नाहीत.

तुम्ही पाच हजार रुपये पाठवा आणि चोरट्याने १० हजार रुपये परत केले. या दरम्यान, त्याने इंजिनिअरला संभाषणात गुंतवून पैसे ट्रान्स्फर होत नाहीत म्हणून वेगळ्याच अकाउंटमध्ये ७५०० रुपये ट्रान्स्फर करायला सांगितले आणि चोरट्याने ७५०० आणि १५,००० रुपये परत करतो,असे सांगितले.

असे करता-करता भाबड्या इंजिनिअरने चुकून एकूण आठ लाख रुपये ट्रान्स्फर केले. त्यानंतर हे सगळे पैसे परत देताना चोरट्याने इंजिनिअरला एक लिंक क्लिक करायला सांगून ओटीपी शेअर करण्यास लावत १५ लाख अधिक १५ लाख अधिक ३० लाख असे एकूण ६८ लाखांना फसविले. या प्रकरणाचा पोलिस तपास चालू आहे.

कोणती काळजी घ्याल?

  • कोणत्याही वस्तू ऑनलाइन विकायच्या असतील, तर त्या व्यक्तीला समक्ष भेटूनच रोख पैसे देऊन व्यवस्थित लिखापढी करून सही घेऊन वस्तू विकावी.

  • अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाइन पेमेंट घेणे टाळावे.

  • आपल्याला पैसे घ्यायचे असतील, तर त्या व्यक्तीला एकही रुपया ट्रान्स्फर करू नका, ती फसवणुकीची सुरवात असते.

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकला क्लिक करू नका.

  • अशा बनावट लिंकला क्लिक केल्यावर कदाचित आपले बँकखाते ‘हॅक’ होऊ शकते, हे लक्षात ठेवा.

  • बँकेत आवश्यक असतील, तेवढेच पैसे ठेवा.

  • आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही व्यक्तीला ‘ओटीपी’ देऊ नये.

  • पैशाची मागणी आली, की धोका आहे, असे समजा.

  • जुन्या वस्तूचे जास्त पैसे मिळवायच्या भानगडीत न पडता, जवळच्या गरजू व्यक्तींना परवडेल अशा किमतीला त्या वस्तू द्या किंवा सामाजिक संस्थांना मोफत द्यायचा विचार करावा.

चूक घडली तर काय करावे?

  • https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी आणि नजीकच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी.

  • त्वरित १९३०/१५५२६० या नंबरवर संपर्क साधावा. या नंबरवरची यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT