Onion Prices Sakal
Personal Finance

Onion Prices: कांदा पुन्हा रडवणार? भाव 50 टक्क्यांनी वाढले; निवडणुका संपताच भाव का वाढले?

Onion Prices: देशात कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याचे भाव 30 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या देशात कांद्याची आवक म्हणजेच त्याचा पुरवठा कमी होत आहे, तर ईद-उल-अजहा (बकरीद) येण्यापूर्वी कांद्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Onion Prices: देशात कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याचे भाव 30 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या देशात कांद्याची आवक म्हणजेच त्याचा पुरवठा कमी होत आहे, तर ईद-उल-अजहा (बकरीद) येण्यापूर्वी कांद्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. आता केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही पावले उचलणे अपेक्षित आहे.

लासलगाव मंडईत कांद्याच्या भावात मोठी वाढ

नाशिकच्या लासलगाव मंडईत कांद्याच्या सरासरी घाऊक भावात लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी येथे सरासरी घाऊक दर 26 रुपये किलो होता, तर गेल्या महिन्याच्या 25 तारखेला हा दर 17 रुपये किलो होता. मात्र, राज्यातील अनेक घाऊक बाजारात महाराष्ट्रातील उत्तम दर्जाच्या कांद्याचे दर 30 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत.

कांद्याचे भाव का वाढत आहेत?

मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे अलीकडे कांद्याचे दर वाढले आहेत. जून महिन्यापासून बाजारपेठेत व बाजारात येणारा कांदा हा शेतकरी व व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या साठ्याचा आहे. 2023-24 च्या रब्बी पिकात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे, त्यानंतर त्यांना कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकार आता कांद्यावरील निर्यात शुल्क हटवू शकेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे आणि याच अपेक्षेनुसार साठेबाज आणि शेतकरी कांद्याची साठवणूक करत आहेत. निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते, असे त्यांना वाटते आणि यावेळी त्यांना आपल्या कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे.

40 टक्के निर्यात शुल्कामुळे निर्यातही कमी होत आहे. 17 जून रोजी होणाऱ्या ईद उल-अजहानिमित्त कांद्याला देशांतर्गत मागणी मजबूत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. नाशिकमधील कांदा व्यापारी विकास सिंग यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून विशेषतः दक्षिणेकडील राज्यांतून कांद्याला जोरदार मागणी आहे.

हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्स एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी सांगितले की, किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकार निर्यात शुल्क हटवू शकते, अशी आशा शेतकरी आणि साठेबाजांना आहे. या समजुतीच्या आधारे भाव वाढतील या आशेने ते कांदे साठवून ठेवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT