Adani Group Sakal
Personal Finance

Adani Group: गौतम अदानी आणखी एक कंपनी घेणार विकत? 'या' कंपनीशी चर्चा सुरु

CK Birla Group and Adani Group: अदानी समूहासाठी हा करार महत्त्वाचा ठरू शकतो.

राहुल शेळके

CK Birla Group and Adani Group: बिर्ला समूहाने ओरिएंट कंपनीचा हिस्सा विकण्यासाठी अदानी समूहाशी चर्चा करत आहे. ही बातमी येताच ओरिएंट सिमेंटच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. ओरिएंट सिमेंटमधील हिस्सा विकण्यासाठी अनेक व्यावसायिकांशी चर्चा झाली होती.

कंपनीत सीके बिर्ला यांची हिस्सेदारी 37.9 टक्के आहे. ज्याचे बाजारमूल्य 3,878 कोटी रुपये आहे. यापूर्वी बिर्ला जेपी मॉर्गन यांच्याशीही चर्चा करत होती.

बिर्ला आणि अदानी समूहाच्या वरिष्ठ व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी संभाव्य करारावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली, असे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांपासून अदानीसोबत चर्चा सुरू होती.

सिमेंट व्यवसायात अदानी समूहाचा दबदबा

अदानी समूहाच्या अदानी सिमेंट या कंपनीने नुकतेच सांघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केले आहे. अदानी सिमेंटची एकूण सिमेंट क्षमता 110 दशलक्ष टन आहे. अदानी समूहाला व्यवसाय वाढवण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरू शकतो.

सीके बिर्ला समूह हा ऑटो अॅक्सेसरीज उत्पादने, इमारत बांधकाम उत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने, सिमेंट, कागद, पंखे आणि इलेक्ट्रिकल वस्तू यांसारख्या विविध उद्योगांमध्ये पसरलेला आहे.

बिर्ला समूह जवळपास चार दशकांपासून सिमेंटचा व्यवसाय करत आहेत. ओरिएंट सिमेंटची प्रमुख बाजारपेठ महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आहे. कंपनीची गुजरातमध्येही कंपनीच्या शाखा आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT