OYO Hotels Sakal
Personal Finance

OYO Hotels: 10 शहरं आणि 90 दिवस, OYO ने वर्ल्ड कपसाठी बनवला मास्टर प्लॅन

ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साठी OYO Rooms ने आपला मास्टर प्लॅन तयार केला आहे.

राहुल शेळके

OYO Hotels: ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साठी हॉटेल रूम बुक करणाऱ्या OYO Rooms ने आपला मास्टर प्लॅन तयार केला आहे. कंपनीने 10 शहरांमध्ये 500 हॉटेल्स बुक करण्याची घोषणा केली आहे. जेणेकरून देश आणि जगातून येणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना राहण्यास अडचण येणार नाही.

ओयो हे टार्गेट 90 दिवसात म्हणजे 3 महिन्यांत पूर्ण करण्याची योजना आखत आहे. ओयोचे म्हणणे आहे की, ते सर्व हॉटेल्स स्टेडियमच्या अगदी जवळ असतील जेणेकरून लोकांना स्टेडियममध्ये येण्यासाठी जास्त त्रास सहन करावा लागणार नाही.

Oyo Rooms ची ही योजना अशा वेळी आली आहे जेव्हा अहमदाबाद आणि इतर शहरांमध्ये हॉटेल बुकिंग जवळपास पूर्ण झाले आहे आणि भाडे 100 ते 200 टक्क्यांनी वाढले आहे. ओयोच्या मते, ही मागणी पूर्ण करण्यासाठी 500 हॉटेल्स जोडण्याचा त्यांचा विचार आहे.

ओयो रूम 500 हॉटेल्स जोडणार

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, जेव्हा कोणत्याही मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या जातात तेव्हा प्रवासाची मागणी आपोआप वाढते. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, OYO आगामी तीन महिन्यांत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची मागणी पूर्ण करण्यासाठी यजमान शहरांमध्ये 500 हॉटेल्स जोडणार आहे.

ते म्हणाले की, देशातून आणि जगातून आलेल्या क्रिकेट प्रेक्षकांना स्वस्त आणि आरामदायी निवास मिळू शकेल अशी कंपनीची इच्छा आहे.

ओयो म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी, शहरांमध्ये वाढत्या मागणीमुळे हॉटेल रूमचे शुल्क आधीच वाढले आहे. यासोबतच स्पर्धेच्या कालावधीत मागणीतही मोठी वाढ झाली आहे.

आयसीसी विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 19 नोव्हेंबरला संपेल. अहमदाबाद, हैदराबाद, दिल्ली, धर्मशाला, चेन्नई, लखनौ, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता आणि पुणे येथे हे सामने खेळले जातील. अंतिम सामना अहमदाबाद येथे होणार आहे.

MakeMyTrip ने देखील नवीन योजना केली लाँच

ऑनलाइन प्रवास सेवा देणाऱ्या मेकमायट्रिपनेही एक योजना सुरू केली आहे. कंपनीने क्रिकेट विश्वचषक खेळल्या जाणाऱ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सांगितले आहे की ज्यांना त्यांचे घर भाड्याने द्यायचे आहे ते वेबसाइटवर त्यांच्या मालमत्तेची नोंदणी किंवा यादी करू शकतात.

MakeMyTripचे परीक्षित चौधरी म्हणाले, “आम्ही देशभरातील निवडक शहरांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होमस्टे प्रॉपर्टी शोधात वाढ पाहिली आहे. हा एक चांगला संकेत आहे आणि क्रिकेट चाहत्यांनी स्थानिक निवासामध्ये जास्त रस दाखवला आहे.''

MakeMyTrip ने सांगितले की, शहरातील क्रिकेट स्टेडियमपासून निवासस्थानाचे अंतर दाखवून क्रिकेट चाहत्यांना सर्वात योग्य निवास पर्याय बुक करण्यात मदत करण्यासाठी त्यांनी एक नवीन सेवा विकसित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT