JSW Chairman Sajjan Jindal Sakal
Personal Finance

Paris Olympics 2024: ऑलिम्पिक पदक विजेत्यांना मिळणार विंडसर कार; उद्योगपतीने केली गिफ्टची घोषणा

MG Windsor: पॅरिस, फ्रान्समध्ये सुरू असलेल्या 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 3 पदके जिंकली आहेत. भारताकडून मनू भाकर, स्वप्नील कुशाळे आणि सरबज्योत सिंग यांनी नेमबाजीत कांस्यपदक पटकावले.

राहुल शेळके

JSW Chairman Sajjan Jindal: पॅरिस, फ्रान्समध्ये सुरू असलेल्या 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 3 पदके जिंकली आहेत. भारताकडून मनू भाकर, स्वप्नील कुशाळे आणि सरबज्योत सिंग यांनी नेमबाजीत कांस्यपदक पटकावले.

आताही अनेक भारतीय खेळाडू पदकांच्या शर्यतीत आहेत. या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. यामध्ये, ज्येष्ठ उद्योगपती आणि JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी पदक विजेत्यांना एक नवीन लक्झरी कार भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.

सज्जन जिंदाल यांनी एका एक्स पोस्टमध्ये जाहीर केले आहे की ते 2024 पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रत्येक भारतीय पदक विजेत्याला एमजी विंडसर कार भेट देतील. त्यांनी म्हटले आहे की खेळाडू त्यांच्या समर्पण आणि यशासाठी पुरस्कारास पात्र आहेत.

मॉरिस गॅरेजेस इंडियाने JSW समूहाच्या सहकार्याने भारतात आपले नवीन CUV MG Windsor लाँच करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सज्जन जिंदाल यांनी हा निर्णय घेतला आहे. सज्जन जिंदाल यांनी त्यांच्या एक्स-पोस्टवर लिहिले की, "टीम इंडियाच्या प्रत्येक ऑलिम्पिक पदक विजेत्याला JSW MG India कडून एक आलिशान कार एमजी विंडसर भेट दिली जाईल हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे!''

कंपनीने म्हटले आहे की, ही कार विंडसर कॅसल म्हणजेच ब्रिटनच्या शाही राजवाड्याच्या वास्तुकलापासून प्रेरित आहे. जिंदाल यांच्या पोस्टला 64,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोकही त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत.

यावर्षी टीम इंडियाचे ऑलिम्पिक किट जेएसडब्ल्यू ग्रुपनेच डिझाइन केले आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, हे किट भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करते. हे किट नवीन फीचर्ससह डिझाइन केलेले आहे.

10 हजारांहून अधिक खेळाडू

पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये 10 हजारांहून अधिक खेळाडू आहेत. भारतातून 117 खेळाडूंचा संघ पॅरिसला गेला आहे. भारत 16 खेळांच्या 69 स्पर्धांमध्ये आव्हान देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT