Parle-G swaps iconic girl for influencer's face on biscuit packet after his hilarious reel  Sakal
Personal Finance

Parle-G: 'पार्ले-जी'ने बदलला आयकॉनिक मुलीचा फोटो! बिस्किटांच्या पाकिटावरील नवीन चेहरा कोण?

Parle-G Biscuit: बिस्किट कंपनी पार्ले-जीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी त्यांच्या बिस्किटांच्या पाकिटावर Zervan J Bunshah नावाच्या युट्युबरचा फोटो लावला आहे. तोही त्या पॅकेटच्या जागी ज्यामध्ये वर्षानुवर्षे प्रसिद्ध मुलीचे चित्र होते.

राहुल शेळके

Parle-G Biscuit: बिस्किट कंपनी पार्ले-जीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी त्यांच्या बिस्किटांच्या पाकिटावर Zervan J Bunshah नावाच्या युट्युबरचा फोटो लावला आहे. तोही त्या पॅकेटच्या जागी ज्यामध्ये वर्षानुवर्षे प्रसिद्ध मुलीचा फोटो होता.

हे सर्व घडले ते जिरवानने केलेल्या एका मजेदार व्हिडिओमुळे, ज्यामध्ये तो विचारतो, "जर तुम्ही पार्लेच्या मालकाला भेटलात तर तुम्ही त्याला काय म्हणाल? पार्ले सर? मिस्टर पार्ले? की पार्ले जी?" व्हिडिओमध्ये जिरवान कारमध्ये बसून विचार करताना दिसत आहे.

पार्ले जी ने आपल्या फेसबुक अकाऊंटवर जिरवानच्या फोटोसह लिहिले की, “जोपर्यंत तुम्हाला पार्ले-जीच्या मालकाला काय म्हणायचे हे समजत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आवडत्या बिस्किटासह एक कप चहाचा आनंद घेऊ शकता.” मजा करा.

या व्हिडिओवर इंस्टाग्राम यूजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने पार्ले-जीचे लक्ष वेधून घेतले आणि कंपनीने एक मजेदार पोस्ट केली आहे. पार्ले-जीकडून उत्तर मिळाल्याने जिरवानला आनंद झाला.

पार्ले प्रॉडक्ट्सची स्थापना 1929 मध्ये झाली. त्यावेळी कंपनीत फक्त 12 लोक काम करायचे. 1938 मध्ये पहिल्यांदा बिस्किटे तयार करण्यात आली. बिस्किटाचे नाव पार्लेज-ग्लॉको असे होते.

80 च्या दशकापर्यंत त्याचे नाव तेच राहिले, परंतु 1981 मध्ये कंपनीने Parlez-Gluco बदलून फक्त 'G' केले. हा ‘जी’ म्हणजे ग्लुकोज. 80 च्या दशकात, हे बिस्किट लोकप्रिय झाले. कंपनीने 'जी' हा शब्द बदलून जीनियस असा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

IPL 2026 CSK Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे १६ गुण झाले तरी...; RCB, MI च्या मदतीशिवाय प्ले ऑफ खेळणे अवघड...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

Road Block: तांबडेमळा येथे रस्ता अडविल्याने रविवार पासून ३०० हून अधिक कुटुंबांचे दळवळण थांबले; दगड, काटेरी फांद्यांमुळे वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT