Paytm confirms resignation of director at banking arm  Sakal
Personal Finance

Paytm: पेटीएमला आणखी एक झटका! पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालकाने दिला राजीनामा; काय आहे प्रकरण?

Paytm: आरबीआयच्या निर्णयानंतर पेटीएम पेमेंट बँक सतत चर्चेत आहे. पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालकाने राजीनामा दिला आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या माहितीनुसार, मंजू अग्रवाल या पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक होत्या.

राहुल शेळके

Paytm: आरबीआयच्या निर्णयानंतर पेटीएम पेमेंट बँक सतत चर्चेत आहे. आता पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालकाने राजीनामा दिला आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या माहितीनुसार, मंजू अग्रवाल या पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक होत्या. त्यांनी 1 फेब्रुवारी रोजी बोर्डाकडे राजीनामा सादर केला. पीटीआयच्या वृत्तानुसार, आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे मंजू अग्रवाल यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले.

नियामक फाइलिंगमध्ये, पेटीएमने म्हटले आहे की, “आम्ही सांगत आहोत की आमची सहयोगी संस्था, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे (पीपीबीएल) मंजू अग्रवाल स्वतंत्र संचालक यांनी 01 फेब्रुवारी 2024 रोजी पीपीबीएलच्या बोर्डाचा राजीनामा दिला आहे.'' (Paytm confirms resignation of director at banking arm)

मंजू अग्रवाल स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये माजी उपव्यवस्थापकीय संचालक आहेत आणि मे 2021 पासून PPBL बोर्डावर कार्यरत होत्या. 31 जानेवारी रोजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर 29 फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी स्वीकारणे आणि क्रेडिट व्यवहार करण्यावर निर्बंध लादले आहेत. (Paytm confirms resignation of independent director Manju Agarwal)

RBI ने बंदी का घातली?

मध्यवर्ती बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत करण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले आहे की त्यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेला मार्च 2022 मध्ये नवीन ग्राहक जोडण्यास थांबवले होते. सिस्टम ऑडिट अहवालात बँकेवर नियमांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सेवांवर परिणाम होणार नाही

पेटीएमवर ही बंदी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांवर आहे, पेटीएम ॲपवर नाही. याचा अर्थ पेटीएम ॲपचे वापरकर्ते पूर्वीप्रमाणे ॲपच्या सेवा वापरण्यास सक्षम असतील. पेटीएमच्या म्हणण्यानुसार, कंपनी आरबीआयच्या सूचनांचे पालन करण्यासाठी पावले उचलत आहे.

याचा वापरकर्त्यांच्या बचत खाती, वॉलेट, फास्टॅग आणि एनसीएमसी खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवर परिणाम होणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. येथे उपलब्ध असलेली त्यांची शिल्लक ग्राहक वापरू शकतात. पेटीएम अनेक बँकांमध्ये पेमेंट कंपनी म्हणून काम करत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT