Paytm  Sakal
Personal Finance

Paytm : ‘पेटीएम’चे कर्मचारी कपातीचे सूतोवाच; तिमाहीत ५५० कोटींचा तोटा, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांचा परिणाम

कर्मचाऱ्यांच्या खर्चात कपात करून वार्षिक खर्च ४.८ कोटी डॉलर ते सहा कोटी डॉलरपर्यंत कमी करण्याचा विचार असल्‍याचे ‘पेटीएम’ची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सने म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘पेटीएम’ची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील मार्च तिमाहीत ५५० कोटी रुपयांचा तोटा नोंदवला असून, उत्पन्नातही मोठी घट झाली आहे. कंपनीने आज तिमाही आणि वार्षिक निकाल जाहीर केले. या तोट्यामुळे कंपनीने खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कर्मचारी कपात करण्याचे सूतोवाच केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या खर्चात कपात करून वार्षिक खर्च ४.८ कोटी डॉलर ते सहा कोटी डॉलरपर्यंत कमी करण्याचा विचार असल्‍याचे ‘पेटीएम’ची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सने म्हटले आहे. कंपनीला २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत १६० कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

एकेकाळी सर्वांत मौल्यवान भारतीय स्टार्टअप असलेल्या या कंपनीच्या पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने नियम उल्‍लंघनाबद्दल ३१ जानेवारी रोजी अतिरिक्त ठेवी आणि टॉप अप स्वीकारण्यास; तसेच ग्राहकांच्या खात्यांमध्ये क्रेडिट व्यवहार करण्यावर निर्बंध घातले होते.

या निर्बंधांनंतर कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कंपनीच्या पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईचा व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यावर कंपनी भर देणार असून, कर्मचारी संख्या कमी केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

जानेवारी-मार्च तिमाहीत ‘पेटीएम’चे उत्पन्न आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या याच तिमाहीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी झाले आहे.

कंपनीचे उत्पन्न २३३४ कोटी रुपयांवरून २२६७ कोटी रुपयांवर आले आहे. या नकारात्मक तिमाही निकालांचा परिणाम आज ‘पेटीएम’च्या शेअरवरही दिसून आला. बाजार उघडताच ‘पेटीएम’च्या शेअरमध्ये जोरदार घसरण झाली. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा २०२२-२३ मधील १७७६ कोटींवरून १४२२ कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे, तर ‘पेटीएम’चा ऑपरेशन्समधील महसूल २४.९ टक्क्यांनी वाढून ९९७७ कोटी रुपये झाला आहे.

सुधारणांवर भर

कंपनी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार, सुधारणा करत असून, त्याकरिता तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली असल्याचे कंपनीचे अध्यक्ष विजयशेखर शर्मा यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, महसूलवाढीसाठी नव्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जात असून, सुधारणांचा परिणाम लवकरच दिसेल आणि कंपनीच्या कामगिरीत लक्षणीय प्रगती दिसून येईल, असा विश्‍वासही शर्मा यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

FDA Crime : मंचर बनावटदूध भेसळ प्रकरण; तीन आरोपींच्या घरांची झडती, लॅपटॉप, कागदपत्रे केली जप्त

Shivneri Fort Landslide : किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे वाहून आला मातीचा ढिगारा

SCROLL FOR NEXT