Physics Wallah may lay off up to 120 employees due to performance issues  Sakal
Personal Finance

Layoffs 2023: फिजिक्सवालाचा मोठा निर्णय! 120 कर्मचार्‍यांना दिला नारळ; काय आहे कारण?

Physics Wallah Layoffs 2023: फिजिक्स वाला कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल शेळके

Physics Wallah Layoffs 2023: कोरोना काळापासून सतत कर्मचारी कपातीच्या बातम्या येत आहेत. आता फिजिक्सवाला या देशातील एडटेक युनिकॉर्न कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 120 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

Entrackr च्या अहवालानुसार, फिजिक्सवाला यांनी सुमारे 70 ते 120 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अहवालानुसार, डेटा विश्लेषक, उत्पादकता आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

कंपनी एक्झिक्युटिव्ह म्हणाले की, "आम्ही पुढील सहा महिन्यांत अतिरिक्त 1,000 कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहोत.''

याआधी Byju's, Unacademy, Vedantu, Cuemath आणि Teachmint सारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे. निधीच्या समस्येमुळे या कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आता या यादीत फिजिक्सवालाचाही समावेश झाला आहे.

YouTube शिक्षक अलख पांडे यांच्या नेतृत्वाखाली फिजिक्सवाला एडटेक युनिकॉर्नची स्थापना 2020 मध्ये झाली. FY22 मध्ये कंपनीचा महसूल 10 पटीने वाढून 232.5 कोटी रुपये झाला.

कंपनीने सुमारे 100 कोटी रुपयांचा नफा कमावला, ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठे आणि एकमेव फायदेशीर एडटेक स्टार्ट-अप बनले. या वर्षी जानेवारीमध्ये कंपनीने विविध पदांवर 2,500 कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखली होती, पण कंपनीने आता कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

फिजिक्सवालाचे YouTube चॅनेलवर 3.1 कोटी पेक्षा जास्त सदस्य आहेत. याशिवाय Google Play Store वर कंपनीचे रेटिंग 4.5 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT