PM Kisan Yojana 18th installment Sakal
Personal Finance

PM Kisan Yojana: पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना देणार मोठी भेट; किसान सन्मान निधीच्या हप्त्याची तारीख जाहीर

PM Kisan Yojana 18th installment: सणासुदीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 9.5 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी, PM मोदी वाशिम येथे एक बटण दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील.

राहुल शेळके

PM Kisan Yojana 18th installment: सणासुदीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 9.5 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी, PM मोदी वाशिम येथे एक बटण दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता.

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होतील, त्याच दिवशी हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.

शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.25 लाख कोटी रुपये मिळाले

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या थेट हस्तांतरण योजनांपैकी एक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना ही योजना सुरू केली होती.

पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट हस्तांतरित केले जातात. जेणेकरून त्यांना महागड्ये बियाणे आणि खतांपासून दिलासा मिळू शकेल. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

पीएम किसान नोंदणीसाठी eKYC आवश्यक

पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल.

तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कसे तपासायचे?

  • जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी प्रथम https://pmkisan.gov.in/ वर जा.

  • मुख्यपृष्ठावरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.

  • यानंतर कॅप्चा टाका.

  • यानंतर Get Status वर क्लिक करा.

  • यानंतर, हप्त्याशी संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल.

  • मोबाईल ॲपद्वारे शेतकरी त्यांच्या पेमेंटची स्थिती तपासू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT