PM Modi to Distribute over 1 Lakh Appointment Letters at Rozgar Mela Today Sakal
Personal Finance

Rozgar Mela: पीएम मोदींनी रोजगार मेळाव्यात एक लाख नियुक्ती पत्रांचे केले वाटप; 'या' विभागांमध्ये होणार भरती

PM Narendra Modi Rojgar Mela Distribution Of Appointment Letters: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सोमवारी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवनियुक्त तरुणांना 1 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे.

राहुल शेळके

Rozgar Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सोमवारी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवनियुक्त तरुणांना 1 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीतील "कर्मयोगी भवन"च्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी केली.

देशभरात 47 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन, 'या' विभागांमध्ये होणार नियुक्त्या

देशभरात 47 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत, केंद्र सरकारच्या विभागांमध्ये भरती होत आहे आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांचा या उपक्रमाला पाठींबा आहे. (PM Modi to Distribute over 1 Lakh Appointment Letters at Rozgar Mela Today)

नवनियुक्त तरुण महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग यांसारख्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये कार्यरत आहेत. संरक्षण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयातील विविध पदांवर भरती झाल्यानंतर सरकारसोबत काम करतील. (PM Narendra Modi Rojgar Mela Distribution Of Appointment Letters)

रोजगार मेळाव्यात आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सरकारमध्ये तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण वेगान वाढत आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये नोकरीच्या जाहिराती देण्यापासून ते नियुक्तीपत्र देण्यापर्यंत बराच वेळ लागत असे. या वेळेचा फायदा घेत त्या काळात लाचखोरी होत होती, असे ते म्हणाले.

भरती वेळेवर पूर्ण करण्यासाठी सरकार कसं काम करत आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. ते म्हणाले की, भरती प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी, यावर आमच्या सरकारचा भर आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाला आपली क्षमता सिद्ध करण्याची समान संधी मिळू लागली आहे.

ते म्हणाले की, आज प्रत्येक तरुणाच्या मनात विश्वास आहे की, मेहनत आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तो आपले स्वत:चे स्थान निर्माण करू शकतो. 2014 पासून, तरुणांना भारत सरकारशी जोडण्याचा आणि त्यांना राष्ट्र उभारणीत सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT