political parties Over 40 crore spent on election ads in November; Congress outspends BJP  Sakal
Personal Finance

Election: निवडणूक जाहिरातीसाठी पैसे खर्च करण्यात काँग्रेस नंबर वन! चक्क भाजपला टाकले मागे? वाचा सविस्तर

Election Expenses: देशातील राजकीय पक्षांनी जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले आहेत.

राहुल शेळके

Election Expenses: देशातील राजकीय पक्षांनी जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजकीय जाहिरातींचा पूर आला होता.

या जाहिराती मोफत प्रकाशित केल्या जात नाहीत. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना पैसे द्यावे लागतात. 20 राजकीय जाहिरातदारांनी केवळ नोव्हेंबर महिन्यात ऑनलाइन जाहिरातींवर 40 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.

राजकीय पक्षांनी केवळ फेसबुक किंवा इंस्टाग्राम (मेटा) वर 5.98 कोटी रुपये खर्च केले होते, तर 36.31 कोटी रुपयांच्या 15,405 राजकीय जाहिराती Google द्वारे प्रकाशित करण्यात आल्या होत्या. असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राज्य युनिट्सने मेटा प्लॅटफॉर्मवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातींवर 2.58 कोटी रुपये खर्च केले, तर काँग्रेसने जाहिरातींवर 2.24 कोटी रुपये खर्च केले. गुगलच्या जाहिरातींवर काँग्रेसने 14.3 कोटी रुपये, बीआरएसने 12.1 कोटी रुपये आणि भाजपने 4.16 कोटी रुपये खर्च केले.

गुगल जाहिरातींवर 206.2 कोटी रुपये खर्च

जवळपास 80 टक्के रक्कम गुगलच्या जाहिरातींवर खर्च करण्यात आली आहे. व्हिडिओ जाहिरातींवर 28.9 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर 20 टक्के रक्कम फोटोंवर खर्च करण्यात आली आहे.

जर आपण Google जाहिरातींबद्दल बोललो तर, 20 फेब्रुवारी 2019 पासून 206.2 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. यामध्ये भाजपने 49.4 कोटी रुपये, द्रमुकने 21.3 कोटी रुपये आणि काँग्रेसने 4.6 कोटी रुपये खर्च केले आहेत.

20 राजकीय पक्षांच्या मेटा पेजेसवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती पाहिल्या तर वेगवेगळे आकडे दिसतात. काँग्रेसने 1,263 जाहिरातींवर एकूण 2.05 कोटी रुपये खर्च केले आहेत, तर भाजपने 3,122 जाहिरातींवर 1.53 कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रत्येक निवडणुकीत विधानसभा असो की लोकसभा, सर्वच पक्ष ऑनलाइन जाहिरातींवर भरपूर पैसा खर्च करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : जूनभर कोरडे राहिले शहर, जुलैच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भरून काढली उणीव

SCROLL FOR NEXT