Pradhan Mantri Jan Dhan Yojana has 510 mn accounts with rs 2.08 trillion deposits up says Minister Karad  Sakal
Personal Finance

PMJDY: प्रधानमंत्री जन-धन खात्यांची संख्या 51 कोटींवर; एकूण डिपॉजिट्स 2 लाख कोटींच्यावर

Pradhan Mantri Jan Dhan Yojana: मोदी सरकारने 9 वर्षांपूर्वी पंतप्रधान जन धन योजना सुरू केली होती.

राहुल शेळके

Pradhan Mantri Jan Dhan Yojana: मोदी सरकारने 9 वर्षांपूर्वी पंतप्रधान जन धन योजना सुरू केली होती. ज्या अंतर्गत देशात लोकांची मोफत खाती उघडण्यात आली. सध्या या खात्याची संख्या 51 कोटींच्या पुढे गेली आहे. 51 कोटी बँक खात्यांमध्ये 2 लाख कोटींहून अधिक रुपये जमा करण्यात आले आहेत. अशी माहिती वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत दिली.

या योजनेंतर्गत, बँक खाती नसलेल्या नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य होते. याद्वारे खातेधारक सरकारी योजनांच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतील.

22 नोव्हेंबर 2023 पर्यंत, 4.3 कोटी PMJDY खात्यांमध्ये शून्य शिल्लक आहे कारण या खात्यांमध्ये किमान शिल्लक राखण्याची गरज नाही. ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आलेल्या या खात्यांपैकी 55.8 टक्के खाती महिलांनी उघडली आहेत.

20 व्या ग्लोबल इनक्लुझिव्ह फायनान्स समिटमध्ये बोलताना, वित्त सेवा सचिव विवेक जोशी यांनी खाजगी क्षेत्रातील बँकांना PMJDY आणि जन सुरक्षा सारख्या सरकारी कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यास सांगितले होते.

जोशी म्हणाले की सार्वजनिक क्षेत्रातील बँका सक्रियपणे सहभागी होत असताना, मुख्य प्रवाहातील खाजगी क्षेत्रातील बँका सहभागी होत नाहीत आणि त्यांना त्यात सहभागी होण्याची गरज आहे. PMJDY व्यतिरिक्त, मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया योजना देखील सरकारने सुरू केल्या आहेत.

जन धन खात्याचे फायदे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जन धन खात्यांसह सर्व मूलभूत बचत बँक ठेव खातेधारकांना कोणतीही किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. या योजनेंतर्गत सरकार लोकांना विविध आर्थिक सेवा अतिशय स्वस्त दरात देते.

एवढेच नाही तर जन धन खातेधारकांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शिष्यवृत्ती, सबसिडी आणि पेन्शनचे पैसे थेट खातेधारकांच्या बँक खात्यात जमा होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Negative Energy Remedies: आजपासून चातुर्मास सुरू, रात्री करा 'हे' चमत्कारिक उपाय, नकारात्मकता राहील दूर

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

SCROLL FOR NEXT