Property Right
Property Right Sakal
Personal Finance

Property Right: वडिलांनी मुलांच्या नावावर मालमत्ता केल्यास मुलगी दावा दाखल करु शकते का? काय सांगतो कायदा

राहुल शेळके

Property Knowledge: मृत्यूपत्र न लिहिता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मालमत्तेबाबत वारसांमध्ये अनेकदा कायदेशीर लढाया पाहायला मिळतात. अनेकवेळा माणूस जिवंत असताना तो इच्छापत्र तयार करतो, पण त्यानंतरही वादाची परिस्थिती निर्माण होते.

मालमत्तेबाबत स्पष्ट कायदे आहेत, त्यानुसार कोणत्या मालमत्तेवर कोण हक्कदार आहे आणि कोण नाही हे ठरवले जाते. मात्र असे असतानाही अनेक वेळा मुलींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते. असे झाल्यास कायद्याचा मार्ग अवलंबून आपले हक्क परत मिळू शकतात.

2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मध्ये सुधारणा करून मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला आहे.

मालमत्तेवरील हक्क आणि हक्काच्या तरतुदींसाठी हा कायदा 1956 मध्ये करण्यात आला होता. यानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा जितका अधिकार आहे तितकाच मुलाचाही आहे. मुली वडिलांच्या संपत्तीवर कधी दावा करू शकते? जाणून घेऊ

जर मुलाने आपल्या वडिलांची मालमत्ता त्यांच्या मुलांना हस्तांतरित केली:

जर वडील हयात असतील आणि त्यांनी स्वतःची मालमत्ता नातवंडांना हस्तांतरित केली असेल, तर मुलींचा त्यावर कोणताही हक्क नाही. जर वडिलांचा मृत्यू झाला असेल आणि मालमत्ता मृत्यूपत्राद्वारे हस्तांतरित केली गेली असेल, तर मुलगी वैध कारणांच्या आधारे त्या मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देऊ शकते.

परंतु मृत्यूपत्र न लिहिता वडिलांचा मृत्यू झाला असेल, तर मृत व्यक्तीच्या मालमत्तेत मुलींना समान हक्क आहे आणि त्या न्यायालयात दावा करू शकतात.

समजा A हा एक पुरुष हिंदू आहे जो मरण पावला आहे आणि गिफ्ट डीड मालमत्ता ही त्याची स्वतःची मालमत्ता होती. अशा स्थितीत पत्नीला त्या मालमत्तेसाठी मृत्युपत्र लिहिता येत नाही.

जर त्याचा मृत्यू झाला तर, हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 अंतर्गत, सर्व वारसांना मालमत्तेत समान वाटा असेल. वर्ग 1 च्या वारसांमध्ये मृत व्यक्तीची पत्नी, मुले आणि आई यांचा समावेश असेल.

जेव्हा मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही:

जर वडिलांनी स्वतःच्या पैशाने जमीन घेतली असेल, घर बांधले असेल किंवा विकत घेतले असेल, तर तो ज्याला पाहिजे त्याला ही मालमत्ता देऊ शकतो.

स्व-अधिग्रहित संपत्ती स्वतःच्या इच्छेने कोणालाही देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणजेच वडिलांनी मुलीला स्वतःच्या मालमत्तेत हिस्सा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीही करू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Heat Wave: शरीरामधील उष्णतेत होते वाढ; जडतात मूळव्याध, ॲसिडिटीसारखे आजार

SCROLL FOR NEXT