Raghuram Rajan on Banking Crisis
Raghuram Rajan on Banking Crisis Sakal
Personal Finance

Banking Crisis: बँकिंग संकटावर रघुराम राजन यांचा सूचक इशारा; म्हणाले, आर्थिक परिस्थिती...

राहुल शेळके

Raghuram Rajan on Banking Crisis:  भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आयएमएफचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी इशारा दिला आहे की बँकिंग क्षेत्रातील संकट आगामी काळात अधिक गडद होऊ शकते.

ते म्हणाले की सिलिकॉन व्हॅली बँक आणि क्रेडिट सुईस बँकेची प्रकरणे पाहता, जागतिक बँकिंग प्रणालीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.

अशा परिस्थितीत जगातील बँकिंग व्यवस्था एका मोठ्या धोक्याकडे वाटचाल करत आहे. (Former RBI Governor Raghuram Rajan, who foresaw 2008 crisis, expects more bank troubles)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनीही 2008 च्या मंदीचे अचूक भाकीत केले होते. राजन म्हणाले की, गेल्या दशकापासून बँकांकडून कर्ज सहज उपलब्ध होते, कारण त्यांच्याकडे तरलतेची कमतरता नव्हती.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील केंद्रीय बँकांनी आपली आर्थिक धोरणे कडक केली आहेत. अशा स्थितीत त्याचा परिणाम आता आर्थिक व्यवस्थेवर दिसून येत आहे. ग्लासगो येथे दिलेल्या एका मुलाखतीत राजन म्हणाले की, मला आशा आहे की आर्थिक परिस्थिती ठीक होईल.

परंतु सध्याची परिस्थिती पाहता येणारे दिवस कठीण असू शकतात. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बाजारात तरलतेचा प्रवाह वाढवण्यात आला होता, मात्र आता तो अचानक ओढला गेला आहे. त्यामुळे रोखीवर अवलंबून असलेल्या नाजूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

बँकिंग व्यवस्थेत मोठ्या समस्या आहेत :

रघुराम राजन म्हणाले की, सिलिकॉन व्हॅली बँक आणि क्रेडिट सुईस बँक संकट हे दाखवते की बँकांमधील आर्थिक समस्येचे मूळ खोलवर आहे.

यासोबतच ते म्हणाले की, बँकांच्या चलनविषयक धोरणांचा प्रभाव खूप खोल आहे, जो हाताळणे सोपे काम नाही, हे आपण विसरलो आहोत. अशा स्थितीत त्याचा परिणाम थेट बँकिंग व्यवस्थेवर दिसून येतो.

2005 मध्येच मंदीचा अंदाज वर्तवण्यात आला होता :

2005 मध्ये रघुराम राजन यांनी मुख्य अर्थतज्ज्ञ असताना 2008 मध्ये बँकिंग संकटाची भविष्यवाणी केली होती, जी नंतर 2008 मध्ये खरी ठरली.

त्यावेळी तत्कालीन अमेरिकन ट्रेजरीने राजन यांचा इशारा विकासविरोधी ठरवून फेटाळून लावला होता, परंतु 2008 मध्ये अमेरिकेतील बँकिंग संकटाने रघुराम राजन यांचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : स्टार प्रचारकांची फौज दिल्लीत;२५ मे रोजी मतदान; मोदी, नड्डा, खर्गे, राहुल, प्रियांका घेणार सभा

Pune Porsche Accident: करोडोंची कार वापरणाऱ्या अग्रवालने सतराशे रुपयांसाठी रखडवलेले पोर्शेचे रजिस्ट्रेशन

Jammu & Kashmir: 'कलम 370 हटवण्याचा निर्णय योग्य'; सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या

Sakal Podcast : मराठीच्या पेपरमध्ये ३३४२ जण नापास ते IPLमध्ये कोणाची कामगिरी ठरणार ‘रॉयल’?

Covid: सिंगापूरनंतर भारतातही परसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

SCROLL FOR NEXT