Rahul Gandhi Sakal
Personal Finance

Rahul Gandhi : अदानींची तुलना थेट 'ईस्ट इंडिया कंपनी'शी; राहुल गांधी म्हणाले, अदानी संपूर्ण...

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अदानीशी संबंधित प्रकरणावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी अदानीशी संबंधित प्रकरणावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.

टीका करताना त्यांनी अदानी समूहाची तुलना ब्रिटीश काळातील 'ईस्ट इंडिया कंपनी'शी केली आणि म्हटले की, ''या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर येईपर्यंत. कॉंग्रेस पक्ष प्रश्न उपस्थित करत राहील.''

राहुल गांधी यांनी त्यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला 'तपश्चर्या' म्हटले आहे. अदानी समूहाशी संबंधित मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत त्यांनी आरोप केला की, "अदानी संपूर्ण संपत्ती हडप करून देशाच्या विरोधात काम करत आहेत".

पक्षाच्या 85 व्या अधिवेशनाला संबोधित करताना ते म्हणाले, "आम्ही संसदेत जेव्हा विचारले की पंतप्रधानांचा अदानीशी काय संबंध आहे, तेव्हा आमचे संपूर्ण भाषण कामकाजातून काढून टाकण्यात आले.

आम्ही संसदेत एकदा नाही तर हजारो वेळा प्रश्न विचारू. आम्ही प्रश्न विचारणे सुरूच ठेवू, जोपर्यंत अदानीजींचे सत्य समोर येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही."

राहुल गांधी यांनी आरोप केला की, "मला अदानीला सांगायचे आहे की, त्यांची कंपनी देशाचे नुकसान करत आहे आणि देशातील संपूर्ण पायाभूत सुविधा बळकावत आहे''

ते पुढे म्हणाले, "देशाचा स्वातंत्र्यलढा ईस्ट इंडिया कंपनी नावाच्या कंपनीच्या विरोधात होता कारण त्याने देशाची सर्व संपत्ती आणि बंदरे इत्यादी काबीज केले होते. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. हे देशविरोधी कृत्य आहे आणि असे झाल्यास संपूर्ण काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात उभा राहील."

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर काँग्रेस प्रश्न विचारत राहील. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर फसवे व्यवहार आणि शेअरच्या किंमतीत फेरफार केल्याचे आरोप केले होते. हे आरोप खोटे असल्याचे सांगत अदानी समूहाने सर्व कायदे आणि तरतुदींचे पालन केले असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी असला तरी 'या' एका निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ; आठव्या वेतन आयोगाचं सोपं गणित

SMAT 2026: वैभव सूर्यवंशीचा कर्णधार म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड! पण, संघ नाही जिंकला; वाचा बिहारचा कोणी करेक्ट कार्यक्रम केला

बाबो! अभिनेत्री ऋतुजाने अवघ्या ४ महिन्यांत घटवलं तब्बल इतकं वजन; ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Thane News: २ तासांचा प्रवास २० मिनिटांत पूर्ण होणार, ठाण्यात नवा पूल उभारणार; एमएमआरडीएचा ९७५.५८ कोटींचा प्लॅन

Latest Marathi News Live Update: मायक्रो फायनान्स कंपनीवर कारवाई होणार- संजय राठोड

SCROLL FOR NEXT