Ramesh Bais sakal
Personal Finance

Ramesh Bais : रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीत भरीव वाढ ; रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीत भरीव वाढ

‘‘परकी गुंतवणूक खेचण्यात महाराष्ट्राने सर्वोत्तम कामगिरी केली असून रोजगारनिर्मिती करण्यातही राज्याला चांगले यश मिळाले आहे. शेतकरी, कामगार, युवकांसह सर्वच समाजघटकांच्या अपेक्षापूर्तीसाठी शासन काम करीत असून महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठीच्या या प्रयत्नांमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे,

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘परकी गुंतवणूक खेचण्यात महाराष्ट्राने सर्वोत्तम कामगिरी केली असून रोजगारनिर्मिती करण्यातही राज्याला चांगले यश मिळाले आहे. शेतकरी, कामगार, युवकांसह सर्वच समाजघटकांच्या अपेक्षापूर्तीसाठी शासन काम करीत असून महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठीच्या या प्रयत्नांमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. तसेच, राज्यातील शेतकरी, कामगार, युवक या घटकांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेले विशेष अधिवेशन यावर्षीचे पहिले अधिवेशन असल्याने शिरस्त्याप्रमाणे त्याची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. देशातील परकी गुंतवणुकीच्या ३८.७८ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे राज्यपाल बैस यांनी भाषणात नमूद करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. बैस म्हणाले, ‘‘रोजगार निर्मिती, उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक यामध्येही भरीव वाढ झाली असून २०२७-२८ पर्यंत पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट देशाने ठरविले आहे. राज्याचीही एक हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे सुसंगत ध्येय आपण ठेवले आहे.’’

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह समाजसुधारकांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार राज्य शासन काम करत असल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध समाजांसाठी असलेल्या योजनांचा आढावा घेतला.

राज्यपाल म्हणाले

  • सामाजिक न्यायासाठी शासन आग्रही

  • शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर

  • सर्वच क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्याचे धोरण

  • शासन आपल्या दारी उपक्रमाचा दोन कोटींहून अधिक जणांना लाभ

  • विविध ७५ प्रकल्पांद्वारे ५३ हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी

  • कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगारनिर्मिती

  • आरोग्य व्यवस्थेच्या अधिक बळकटीकरणावर भर दिला जात आहे

  • पायाभूत सुविधांच्या विस्तारात अग्रेसर

  • सौर ऊर्जा वापराला विशेष प्रोत्साहन

आरक्षण देण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करीत असल्याचे सांगत राज्यपाल रमेश बैस यांनी, मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील ७५ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना’ सुरू केली असल्याचे सांगितले. ‘सारथी’ संस्थेच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, लातूर, नागपूर, पुणे विभागीय व उपकेंद्र कार्यालयाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत १७ हजार ५०० पेक्षा अधिक मराठा समाजातील लाभार्थींना त्यांच्या व्यावसायिक कर्जाकरिता व्याज परतावा म्हणून २३२ कोटी रुपये वितरित केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

SCROLL FOR NEXT