Ratan Tata  Sakal
Personal Finance

Ratan Tata Brother: अवघ्या दोन खोल्यांच्या घरात राहतात रतन टाटांचे बंधू, अन् संपत्ती किती...

गोयंका यांनी जिमी टाटा हे उत्तम स्क्वॅश खेळाडू असल्याचेही सांगितले होते.

राहुल शेळके

Ratan Tata Brother: रतन टाटा यांचे नाव कोणाला माहीत नसेल! टाटा ग्रुप भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. त्याला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे. ते आजही टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठीही प्रसिद्ध आहेत.

संपूर्ण टाटा कुटुंबाला नेहमीच साधेपणा आवडतो. आज आम्ही तुम्हाला रतन टाटा यांच्या धाकट्या भावाविषयी सांगणार आहोत. रतन टाटा यांच्या भावाचे नाव जिमी टाटा आहे.

पूर्ण नाव जिमी नवल टाटा आहे. त्यांच्या मोठ्या भावाप्रमाणेच जिमी यांनाही साधेपणा आवडतो आणि ते लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.

मुंबईतील कुलाबा येथे एक छोटेसे घर आहे:

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी काही काळापूर्वी ट्विटरवर रतन टाटा यांच्या धाकट्या भावाची माहिती शेअर केली होती. त्यांनी सांगितले की, जिमी टाटा मुंबईतील कुलाबा येथे 2 खोल्यांच्या छोट्या घरात राहतात. गोयंका यांनी जिमी टाटा हे उत्तम स्क्वॅश खेळाडू असल्याचेही सांगितले होते.

फायनान्शिअल एक्सप्रेसच्या एका बातमीत असा दावा करण्यात आला आहे की जिमी टाटा केवळ 2 खोल्यांच्या घरातच राहत नाहीत तर स्मार्टफोन आणि स्मार्ट उपकरणांच्या जमान्यात ते मोबाईल फोनपासूनही दूर राहतात.

सामान्य व्यक्तीप्रमाणे ते रोज वर्तमानपत्र वाचतात. त्यांंना पुस्तके वाचण्याचीही आवड आहे. एकंदरीत, टाटा कुटुंबातील असूनही, जिमी टाटा एका सामान्य भारतीय व्यक्तीप्रमाणे जीवन जगत आहेत.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिमी टाटा अब्जावधी संपत्तीचे मालक आहेत. त्यांना वारसाहक्काने भरपूर संपत्ती मिळाली आहे. त्यांच्याकडे टाटा ग्रुपचे टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा सन्स, टीसीएस, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स आणि टाटा केमिकल्स सारख्या कंपन्यांचे शेअर्स आहेत.

जिमी टाटा यांची संपत्ती:

ते टाटा ट्रस्टचे विश्वस्तही आहेत. जिमी टाटा ज्या कंपन्यांमध्ये भागधारक आहेत त्यांच्या कारभारावर आणि कामगिरीचे बारकाईने निरीक्षण करतात.

अंदाजानुसार, जिमी टाटाची एकूण संपत्ती 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. टाटा समुहाच्या कंपन्यांच्या लाभांशातून ते चांगली कमाई करत आहे, त्यांचे शेअर्स लाखोंमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT