RBI Balance Sheet Sakal
Personal Finance

RBI Balance Sheet: आरबीआयचा ताळेबंद पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा अडीच पट मोठा; किती आहे संपत्ती?

RBI Balance Sheet: 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदात चांगली वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदाचा आकार 70 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

राहुल शेळके

RBI Balance Sheet: 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदात चांगली वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदाचा आकार 70 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. ताळेबंदाचा आकार आता पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या अडीचपट इतका आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या वार्षिक अहवालातून रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदाची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

RBI च्या वार्षिक अहवालानुसार, केंद्रीय बँकेच्या ताळेबंदाचा आकार 2023-24 या आर्थिक वर्षात 11.08 टक्क्यांनी वाढून 70.48 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डॉलरच्या बाबतीत हा आकडा 844.76 अब्ज डॉलर्स होतो. पाकिस्तानच्या जीडीपीबद्दल बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार सध्या त्याचा आकार 338.24 अब्ज डॉलर आहे. म्हणजे आरबीआयच्या ताळेबंदाचा आकार पाकिस्तानच्या जीडीपीच्या अडीचपट आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत रिझर्व्ह बँकेची भूमिका सकारात्मक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन चांगला असल्याचे रिझर्व्ह बँकेला वाटते. मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स बळकट झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होत आहे. मात्र, रिझर्व्ह बँक अजूनही अन्नधान्याच्या चलनवाढीबाबत चिंतेत आहे. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे एकूण महागाई 4 टक्क्यांच्या लक्ष्यात येत नाही.

वार्षिक अहवालानुसार, रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदाचा आकार आता देशाच्या जीडीपीच्या 24.1 टक्के इतका झाला आहे. त्यापूर्वी, मार्च 2023 ला संपलेल्या 2022-23 आर्थिक वर्षात, RBI च्या ताळेबंदाचा आकार 63.44 लाख कोटी रुपये होता, जो त्यावेळच्या भारताच्या GDP च्या आकाराच्या 23.5 टक्के इतका होता.

रिझर्व्ह बँकेने या महिन्यात केंद्र सरकारला चांगला लाभांश देऊन अनोखा विक्रम केला आहे. सेंट्रल बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 2.11 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी हस्तांतरित केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 141.23 टक्के अधिक आहे. उत्पन्न वाढले आणि खर्च कमी झाल्याचा फायदा रिझर्व्ह बँकेला झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात RBI च्या उत्पन्नात 17.04 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर याच कालावधीत रिझर्व्ह बँकेचा खर्च 56.30 टक्क्यांनी कमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT