RBI directs banks to keep all branches open till March 31 for annual closing Sakal
Personal Finance

RBI On Financial Year : आरबीआयने जारी केला आदेश; बँकेच्या शाखा 31 मार्चपर्यंत राहतील सुरु, कारण...

बँकांच्या सर्व शाखा 31 मार्चपर्यंत सुरू राहतील असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Financial Year Annual Closing : भारतातआर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते आणि पुढील वर्षाच्या 31 मार्च रोजी संपते. बँकांच्या सर्व शाखा 31 मार्चपर्यंत सुरू राहतील असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांना दिला आहे.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की त्यांच्या सर्व एजन्सी बँकांना त्यांच्या शाखा 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात, केंद्रीय बँकेने 21 मार्च रोजी एक निवेदन जारी केले आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 या महिन्याच्या 31 तारखेला संपणार आहे. (RBI directs banks to keep all branches open till March 31 for annual closing)

म्हणूनच आरबीआयने बँकांना सांगितले आहे की, या महिन्यातील सरकारशी संबंधित सर्व व्यवहार 31 मार्चपर्यंत निकाली काढावेत. यासाठी त्यांनी बँकांना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. यामुळेच आरबीआयने सर्व बँकांना सरकारी व्यवहारांसाठी शाखा उघडण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, या दिवशी बँकांमध्ये ग्राहकांसाठी कोणतेही काम होणार नाही. मात्र, धनादेश बँकेच्या शाखेत जमा करता येतो. तसेच, या दिवशी ऑनलाइन बँकिंगही सुरू राहणार आहे. 31 मार्चनंतर 1 आणि 2 एप्रिलला सलग दोन दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

RBI चे काय निर्देश आहेत :

"सर्व एजन्सी बँकांनी 31 मार्च 2023 रोजी सामान्य कामकाजाच्या वेळेत सरकारी व्यवहारांशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी त्यांच्या नियुक्त शाखा खुल्या ठेवाव्यात," असे आरबीआय बँकेच्या पत्रात म्हटले आहे.

त्यात पुढे म्हटले आहे की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) प्रणालीद्वारे 31 मार्च 2023 च्या मध्यरात्री 12 पर्यंत व्यवहार सुरू राहतील.

तसेच, 31 मार्च रोजी सरकारी धनादेश जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल, ज्यासाठी आरबीआयचे डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम (DPSS) आवश्यक निर्देश जारी करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT