RBI Governor Sakal
Personal Finance

RBI Governor: व्याजदर कमी करण्याचा निर्णयावर RBI गव्हर्नर यांचं मोठ विधान म्हणाले, ''अर्थव्यवस्थेच्या...''

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सीआयआयच्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना या गोष्टी सांगितल्या आहेत.

राहुल शेळके

RBI Governor Shaktikanta Das: एकीकडे मध्यवर्ती बँकेच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे जागतिक मंदीने खळबळ माजवली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या विकास दराबाबत कोणतीही स्पष्ट परिस्थिती नाही.

आतापर्यंत समोर आलेले सर्व अहवाल आशा दाखवत आहेत. अशा परिस्थितीत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आगामी काळात रेपो दरात वाढ झाली तर त्याचा परिणाम बाजारावर दिसून येईल.

गेल्या बैठकीत चलनविषयक समितीने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता, त्याचा परिणाम देशाच्या विकासासोबतच वाढत्या महागाईवरही दिसून आला.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, व्याजदर येत्या काही दिवसांत वाढणार की कमी होणार हे अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर अवलंबून असेल. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी 7 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतो असा अंदाज आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर एप्रिलच्या तुलनेत कमी असेल. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर 4.70 टक्क्यांच्या 18 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता, तर एका वर्षापूर्वी एप्रिल 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्क्यांवर पोहोचला होता.

भारतीय बँकिंग प्रणाली मजबूत:

बँकिंग प्रणालीवर विश्वास व्यक्त करताना, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की भारतीय बँकिंग प्रणाली मजबूत स्थितीत आहे.

महागाईविरोधातील लढाई सुरूच:

गव्हर्नर म्हणाले की, महागाईविरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही. तरीही आपल्याला सतर्क राहावे लागेल. यात निष्काळजीपणा होणार नाही. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंग पुरी अश्विनी वैष्णव हे देखील आज या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT