RBI Governor
RBI Governor Sakal
Personal Finance

RBI Governor: 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? RBI गव्हर्नर म्हणाले...

राहुल शेळके

RBI Governor Shaktikanta Das: RBI ने 2000 च्या नोटा चलनातून काढुन टाकण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सर्व बँकांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. मात्र आता आणखी एक प्रश्न समोर येत आहे.

तो म्हणजे 1000 रुपयांची नोट परत येणार का? याबाबत आरबीआय गव्हर्नरन शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे. RBI 1000 रुपयांची नोट परत आणण्याचा विचार करत नसल्याचे RBI गव्हर्नरांनी स्पष्ट केले आहे.

1,000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता, दास यांनी उत्तर दिले की हा सर्व अंदाज आहे. सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही.

नोव्हेंबर 2016 मध्ये, RBI ने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर 2000 रुपयांची नोट जारी केली.

1000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर 10 लाख कोटी रुपये एका रात्रीत गायब झाले. त्याची भरपाई म्हणून 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणली गेली.

शक्तीकांत दास म्हणाले की, सध्या इतर मूल्यांच्या नोटाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून 2000 रुपयांच्या नोटांचा उद्देशही पूर्ण झाला आहे. त्यामुळे 2018-19 मध्ये त्याची छपाईही थांबवण्यात आली होती.

पत्रकारांशी बोलताना दास म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. आता बँकांमध्ये गर्दी करण्याचे कारण नाही.

आपल्याकडे 30 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. ते म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर फार कमी होईल. 2000 रुपयांच्या नोटा चलनात असलेल्या एकूण चलनाच्या केवळ 10.8 टक्के आहेत.

2000 च्या नोटांवरील निर्णय क्लीन नोट धोरणाचा भाग:

RBI गव्हर्नर म्हणाले की चलनातून 2000 च्या नोटा काढून घेणे क्लीन नोट धोरणाचा भाग आहे. नोटा बदलण्यासाठी खूप वेळ आहे, त्यामुळे लोकांनी नोटा बदलताना कोणत्याही प्रकारची घाई करू नये.

आरबीआय ज्या काही अडचणी येतील ते ऐकून घेईल आणि जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात घेईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: भाजप जिंकल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करुन SC-ST-OBC ना देऊ - अमित शाह

Fact Check : लोकसभा निवडणुकीसाठी परदेशातून मतदानासाठी आलेल्या मुस्लिमांना मदत जाहीर करणारे ते व्हायरल पत्र खोटे

संदेशखाली प्रकरणात मोठा यू टर्न! दोन पीडितांनी तक्रारी घेतल्या मागे, महिला आयोगावर केले आरोप

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा उद्या निकाल; पाच आरोपींवर चालला खटला

SAKAL Exclusive : आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमात; मे महिन्यातही एकही प्रवेश नाही

SCROLL FOR NEXT