RBI imposes monetary penalty on five co-operative banks. Details here
RBI imposes monetary penalty on five co-operative banks. Details here  Sakal
Personal Finance

RBI Action: पाच सहकारी बँकांवर आरबीआयची मोठी कारवाई! लाखोंचा दंड, काय आहे प्रकरण?

राहुल शेळके

RBI Imposes monetary penalty: रिझर्व्ह बँकेने 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या सर्व बँकांवर नियमांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. ज्या बँकांवर कारवाई करण्यात आली त्यात पश्चिम बंगालची कोंटाई को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईची सर्वोदय सहकारी बँक, महाराष्ट्रातील (विटा) मनमंदिर सहकारी बँक, महाराष्ट्रातील (पुणे) सन्मित्र को-ऑपरेटिव्ह बँक आणि गुजरातमधील मेहसाणा लखवार नागरीक सहकारी बँक यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पश्चिम बंगालच्या पूरबा मेदिनीपूरच्या कोंटाई सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबईस्थित सर्वोदय सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क अंतर्गत बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विटा येथील मनमंदिर सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसी डायरेक्शन 2016 अंतर्गत नियमांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय सहकारी बँकेच्या ठेव खात्यांच्या देखभालीच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल देखील कारवाई करण्यात आली आहे.

पुणे येथील सन्मित्र सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सहकारी बँकेच्या ठेव खात्यांच्या देखभालीचे नियम न पाळल्याचा बँकेवरचा आरोप सिद्ध झाला आहे.

याशिवाय गुजरातमधील मेहसाणा येथील लखवार नागरी सहकारी बँक लिमिटेडला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना कर्ज देण्यासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याने बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 कोटींहून अधिक दंड

रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याबद्दल बँका, NBFC आणि इतर संस्थांना या आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर 176 प्रकरणांमध्ये सहकारी बँकांना 14 कोटींहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.

लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने ही माहिती दिली आहे. उत्तरानुसार खाजगी क्षेत्रातील बँकांवर 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त, सरकारी बँकांना 3.65 कोटी रुपये, विदेशी बँकांना 4.65 कोटी रुपये आणि एनबीएफसीवर 4.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT