RBI  Sakal
Personal Finance

RBI Penalty: आरबीआयने चार सहकारी बँकांना ठोठावला दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Penalty: आरबीआयने बँकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत

राहुल शेळके

RBI Penalty: आरबीआयने चार बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, तपासादरम्यान या बँकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, त्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने सहकारी बँका असलेल्या या चार बँकांची नावे जाहीर केली आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार ज्या बँकांवर दंड ठोठावण्यात आला आहे त्यात बारामती सहकारी बँक, बेचराजी नागरिक सहकारी बँक, वाघोडिया अर्बन सहकारी बँक आणि विरमगाम मर्कंटाइल सहकारी बँक यांचा समावेश आहे.

कोणत्या बँकेला किती दंड?

बारामती सहकारी बँकेला 2 लाख आणि बेचराजी नागरीक सहकारी बँकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. याशिवाय वाघोडिया अर्बन सहकारी बँकेला 5 लाख आणि विरमगाम मर्कंटाइल सहकारी बँकेला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने बँकांना सूचना दिल्या आहेत

रिझर्व्ह बँकेने या सर्व बँकांना वेगवेगळ्या कारणांसाठी दंड ठोठावला असून सर्व बँकांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी नियमांचे पालन न केल्यास, दंड आणि निर्बंध लादले जाऊ शकतात.

सायबर सुरक्षेचा प्रश्न

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने सायबर सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणखी एका बँकेला दंड ठोठावला होता. एपी महेश सहकारी बँकेला 65 लाखांचा दंड ठोठावला आहे. हॅकर्सनी या बँकांमध्ये घुसून 12.48 कोटी रुपयांची चोरी केली होती.

ग्राहकांवर काय परिणाम होईल?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ज्या बँकांवर दंड आकारला जातो. तो फक्त बँकांना भरावा लागतो. यामध्ये खातेदारांना कोणताही दंड भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT