RBI UPI Lite  Sakal
Personal Finance

UPI Lite: आता इंटरनेटशिवाय करता येणार इतक्या रुपयांपर्यंत पेमेंट, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

RBI News : RBI ने 10 ऑगस्ट रोजी चलनविषयक धोरण बैठकीत मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती.

राहुल शेळके

UPI Lite Transaction : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने UPI Lite द्वारे ऑफलाइन व्यवहारांची मर्यादा आजपासून वाढवली आहे. एक परिपत्रक जारी करून, आरबीआयने म्हटले आहे की, देशातील ज्या भागात इंटरनेट नाही किंवा सिग्नल खूपच कमकुवत आहे, त्यांच्यासाठी UPI लाइटद्वारे ऑफलाइन मोडमध्ये व्यवहारांची मर्यादा 200 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आली आहे.

ऑफलाइनद्वारे छोट्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांची मर्यादा वाढवण्यासाठी आरबीआयने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात आरबीआयने म्हटले आहे की ऑफलाइन पेमेंट व्यवहाराची मर्यादा 500 रुपये करण्यात आली आहे.

इंटरनेट सुविधा नसणाऱ्यांसाठी ऑफलाइन पेमेंट सुविधा सप्टेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती. यासाठी नवीन पेमेंट प्लॅटफॉर्म UPI-Lite लाँच करण्यात आले. त्यावेळी त्यातून पैसे भरण्याची मर्यादा केवळ 200 रुपये होती. यापूर्वी, RBI गव्हर्नरने 10 ऑगस्ट रोजी चलनविषयक धोरण बैठकीत मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती.

एक कोटीपेक्षा जास्त व्यवहार

अल्पावधीतच, हे पेमेंट प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय झाले. सध्या या प्लॅटफॉर्मवरून एक कोटींहून अधिक व्यवहार होत आहेत. UPI-Lite चा वापर वाढवण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात RBI ने NFC तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑफलाइन व्यवहाराची सुविधा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. NFC सह व्यवहार करण्यासाठी पिन आवश्यक नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT