RBI Monetary Policy meet next week may keep rate unchanged What are the experts' predictions  Sakal
Personal Finance

पुढील आठवड्यात RBIची होणार बैठक; तुमचा EMI वाढणार की कमी होणार, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Monetary Policy Committee: पुढील आठवड्यात रिझव्‍‌र्ह बँकेची महत्त्वाची धोरणात्मक बैठक होणार असून त्यात रेपो दरांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

राहुल शेळके

Monetary Policy Committee: पुढील आठवड्यात रिझव्‍‌र्ह बँकेची महत्त्वाची धोरणात्मक बैठक होणार असून त्यात रेपो दरांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणात असा अंदाज आहे की रिझर्व्ह बँक सलग पाचव्यांदा दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते.

सर्वेक्षणानुसार महागाईत दिलासा आहे. त्यामुळे दर वाढण्याची भीती संपली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेची धोरण आढावा बैठक 6 डिसेंबरला सुरू होईल आणि निकाल 8 डिसेंबरला जाहीर होईल.

रॉयटर्सने 17 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 64 अर्थतज्ज्ञांचे मत विचारले होते आणि त्या सर्वांनी सांगितले की रिझर्व्ह बँक आपल्या बैठकीत रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवू शकते. अंदाजानुसार, चलनवाढीचा दर घसरला आहे आणि तो ऑक्टोबरमध्ये 5 टक्क्यांच्या खाली आला आहे.

अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक आपल्या सध्याच्या रणनीतीमध्ये लवकरच कोणताही बदल करणार नाही, अशी शक्यता आहे. म्हणजे व्याजदर वाढले नसले तरी कपातीबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार नाही.

सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सर्व अर्थतज्ज्ञांच्या सरासरी अंदाजानुसार, 2024 च्या तिसऱ्या तिमाहीपासून म्हणजेच सप्टेंबरच्या तिमाहीपासून दर कपातीची सुरुवात होऊ शकते. या आधी दर कपात सुरू होऊ शकते, असे निम्म्या अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

56 अर्थतज्ज्ञांपैकी ज्यांनी कपातीबाबत अंदाज दिला आहे, त्यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 29 अर्थतज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की रेपो दर 2024 च्या मध्यापर्यंत स्थिर राहतील.

22 अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की वर्षाच्या मध्यापर्यंत दर एक चतुर्थांश टक्क्यांनी कमी होऊन 6.25 टक्क्यांवर येऊ शकतात. तर 5 जणांचा असा विश्वास आहे की पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत दरांमध्ये दीड टक्के कपात शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT