RBI Monetary Policy Updates Governor Shaktikanta Das announce MPC decision Know Details  Sakal
Personal Finance

RBI MPC Meet 2024: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा मोठा निर्णय; तुमचा EMI कमी झाला का?

RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा निकाल आज जाहीर झाला आहे. आरबीआयने गेल्या वर्षभरात रेपो दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो दर 6.5 टक्के आहेत. आरबीआयची बैठक 3 एप्रिलपासून सुरू झाली असून आज याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे.

राहुल शेळके

RBI Monetary Policy 2024 Updates: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा निकाल आज जाहीर झाला आहे. आरबीआयने गेल्या वर्षभरात रेपो दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो दर 6.5 टक्के आहेत. आरबीआयची बैठक 3 एप्रिलपासून सुरू झाली असून आज याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. रिझर्व्ह बँकेने आज रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवला आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचा EMI वाढणार नाही. (RBI Monetary Policy 2024 Updates Governor Shaktikanta Das announce MPC decision Know Details)

रेपो दर म्हणजे काय?

ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेता आणि त्याची निश्चित व्याजासह परतफेड करता, त्याचप्रमाणे सार्वजनिक, खाजगी आणि व्यावसायिक क्षेत्रातील बँकांनाही त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते.

अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना ज्या व्याजदराने कर्ज दिले जाते त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट कमी झाला की सर्वसामान्यांना दिलासा मिळतो आणि रेपो दर वाढला की सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतात.

रेपो दर वाढल्याने EMI का वाढतो?

रेपो रेट हा एक प्रकारचा बेंचमार्क आहे, ज्याच्या आधारावर इतर बँका सामान्य लोकांना दिलेल्या कर्जाचा व्याजदर ठरवतात. रेपो दर वाढला की बँकांना जास्त व्याजदराने कर्ज मिळते. (RBI MPC meet updates RBI keeps repo rate unchanged at 6.5%)

अशा परिस्थितीत बँका सर्वसामान्यांसाठी गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदर वाढवतात. व्याजदरात वाढ झाल्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ईएमआयवर होतो आणि त्यांचा ईएमआय वाढतो.

रिव्हर्स रेपो म्हणजे काय?

रिव्हर्स रेपो रेट हा असा दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यावसायिक बँकांचे अतिरिक्त पैसे स्वतःकडे जमा करते. त्या बदल्यात आरबीआय या बँकांना व्याज देते. याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

रिव्हर्स रेपोचा तुमच्यावर कसा परिणाम होतो?

जेव्हा बाजारात रोखीची उपलब्धता वाढते तेव्हा महागाई वाढण्याची शक्यताही वाढते. अशा परिस्थितीत, आयबीआय रिव्हर्स रेपो रेट वाढवते जेणेकरून बँक व्याज मिळविण्यासाठी त्यांचे पैसे आरबीआयकडे ठेवतात. बाजारात वितरित करण्यासाठी बँकांकडे कमी पैसे शिल्लक राहतात. (RBI monetary policy live updates: RBI MPC keeps repo rate unchanged at 6.5%; GDP likely to grow at 7%, inflation at 4.5% in FY25, says Das)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT