RBI MPC Meeting Sakal
Personal Finance

RBI MPC Meeting: अच्छे दिन कधी येणार? महागाईबाबत RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले...

RBI MPC Meeting: RBI ने रेपो दरात कोणताही बदल केला नाही

राहुल शेळके

RBI MPC Meeting: चलनविषयक धोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर, रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी रेपो रेट 6.50 टक्के कायम ठेवण्याची घोषणा केली.

RBI ने रेपो दरात कोणताही बदल केला नाही ही FD योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण त्यांना मुदत ठेवींवर जास्त व्याजदराचा लाभ मिळत राहील.

दुसरीकडे, महागाईबाबत शक्तीकांत दास यांनी माहिती देताना सांगितले की, FY24 महागाई दर 5.4% असा अंदाज आहे. यासोबतच, ते म्हणाले की ते महागाई कमी करणे हे RBI चे लक्ष आहे.

RBI गव्हर्नर म्हणाले की, जुलैमध्ये टोमॅटो आणि भाज्यांच्या किंमतीत वाढ दिसून आली. याशिवाय जागतिक धोरणांचा महागाई दरावर परिणाम झाला. खरीप पिकांच्या अनिश्चिततेमुळे महागाईचा फटका बसला आहे.

शक्तीकांता दास म्हणाले की, आर्थिक वर्ष 24 (FY24) मध्ये महागाई दर 5.4% असण्याचा अंदाज आहे. मात्र, डाळींची लागवड कमी झाल्याने भाववाढीचा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी काळात महागाई कमी होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. जुलै आणि ऑगस्टमधील महागाईबाबत दास म्हणाले की, पुरवठ्यातील दबावामुळे जुलै-ऑगस्टमध्ये महागाई वाढल्याचे दिसून आले.

कोरोनानंतर रिझर्व्ह बँकेने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रेपो दरात सातत्याने कपात केली होती. त्यावेळी रेपो दर 4 टक्के करण्यात आला होता. रेपो दर बराच काळ 4 टक्के राहिला. नंतर महागाई नियंत्रणाबाहेर गेल्याने आणि यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हसह सर्व केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ केल्यानंतर रिझर्व्ह बँकेला रेपो दर वाढवणे भाग पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT