RBI penalises SBI, Canara Bank, City Union Bank for flouting norms  Sakal
Personal Finance

RBI Action: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; SBIसह तीन बँकांवर ठोठावला दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Penalty On Banks: आरबीआयने देशातील बहुतांश बँकांवर कारवाई केली आहे. आता RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एसबीआयवर ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

राहुल शेळके

Penalty On Banks: आरबीआयने देशातील बहुतांश बँकांवर कारवाई केली आहे. आता RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एसबीआयवर ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

या प्रकरणाची माहिती देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्टेट बँकेसह इतर काही बँकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI penalises SBI, Canara Bank, City Union Bank for flouting norms)

स्टेट बँकेला दोन कोटींचा दंड

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला दंड ठोठावण्यात आला आहे, असे आरबीआयने सोमवारी सांगितले. एसबीआयला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड ठेवीदार एज्युकेशन अवेअरनेस फंड आणि कंपनीच्या पेड-अप शेअर कॅपिटलच्या 30% पेक्षा जास्त असलेल्या कंपनीमधील शेअरहोल्डिंगशी संबंधित उल्लंघनामुळे आहे. (RBI fines SBI, Canara, City Union banks for violations)

या प्रकरणात, आरबीआयने पुढे सांगितले की सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने काही कंपन्यांच्या पेड-अप शेअर भांडवलाच्या 30% पेक्षा जास्त रकमेचे शेअर्स तारण ठेवले आहेत.

कॅनरा बँकेलाही दंड ठोठावला

याशिवाय आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल कॅनरा बँक लिमिटेडला 32.30 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार असे आढळून आले की कॅनरा बँकेने 31 मार्च 2021 पर्यंत खात्यांशी संबंधित नियमांचे पालन केले नाही.

युनियन बँकेलाही दंड ठोठावला

आरबीआयने नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता वळवण्याशी संबंधित उल्लंघनासाठी सिटी युनियन बँकेला 66 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

ओशन कॅपिटल मार्केट लिमिटेडवरही कारवाई

आरबीआयने सांगितले की, ओडिशातील राउरकेला येथे असलेल्या ओशन कॅपिटल मार्केट लिमिटेडवर 16 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. कंपनीवर एनबीएफसी (नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या) संबंधित नियमांचे पालन न केल्याचा आरोप होता.

तपासानंतर RBI वेळोवेळी अशी कारवाई करत असते. तपासणीत आढळलेल्या त्रुटींनंतर हा दंड ठोठावण्यात आल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दंड आकारला जातो. तो दंड फक्त बँकांना भरावा लागतो. यामध्ये खातेदारांना कोणताही दंड भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो. त्यामुळे या बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT