RBI Report Sakal
Personal Finance

RBI Report: देशाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात! लोकांची बचत झाली कमी; कर्जाचा वाढला बोजा, RBIच्या अहवालात खुलासा

RBI Report: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी आर्थिक स्थिरता अहवालात म्हटले आहे की कोविड नंतर लोकांचे कर्ज वाढले आहे. यासोबतच गेल्या दहा वर्षांत बचतीचे प्रमाणही कमी झाले आहे. आरबीआयने सांगितले की लोक कमी बचत करत आहेत आणि कर्ज घेत आहेत.

राहुल शेळके

RBI Report: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी आर्थिक अहवालात म्हटले आहे की कोविड नंतर लोकांचे कर्ज वाढले आहे. यासोबतच गेल्या दहा वर्षांत बचतीचे प्रमाणही कमी झाले आहे. आरबीआयने सांगितले की लोक कमी बचत करत आहेत आणि कर्ज घेत आहेत.

यामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. RBI च्या मते, आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण लोकांच्या बचतीमध्ये GDP च्या 18.4% ने घट झाली आहे. 2013 ते 2022 पर्यंत, लोकांनी त्यांच्या कमाईच्या सरासरी 39.8 टक्के बचत केली.

पण आर्थिक वर्ष 2023 मध्ये बचत 28.5 टक्क्यांवर घसरली. 2013 ते 2022 पर्यंत, लोकांनी त्यांच्या कमाईच्या GDP च्या सरासरी 8 टक्के बचत केली, परंतु 2023 मध्ये हे प्रमाण 5.3 टक्के झाले. भारताचे एकूण कर्ज GDP च्या 40.1 टक्के आहे, जे इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत जास्त आहे.

बचत करण्याच्या पद्धतीत बदल होत आहे

कोविड-19च्या काळात झपाट्याने वाढलेली घरगुती आर्थिक बचत आता कमी झाली आहे. लोक आता त्यांच्या बचतीत विविधता आणत आहेत आणि त्यांचे भांडवल बिगर बँक आणि भांडवली बाजारात गुंतवत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी जाहीर केलेल्या 29व्या आर्थिक स्थिरता अहवालात म्हटले आहे की, शेड्युल्ड कमर्शियल बँकांचे (SCBs) एनपीए (नॉन पर्फोरमिंग अ‍ॅसेट) प्रमाण 2.8% या नीचांकी पातळीवर आले आहे. आरबीआयने म्हटले आहे की सार्वजनिक कर्जामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आहे, परंतु भारताची आर्थिक व्यवस्था मजबूत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, अहवालात असे म्हटले आहे की दीर्घकाळापर्यंत भू-राजकीय तणाव, वाढलेले सार्वजनिक कर्ज आणि महागाई कमी होण्याच्या मंद गतीने वाढलेल्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांना न जुमानता, जागतिक वित्तीय व्यवस्था लवचिक राहिली आहे आणि आर्थिक परिस्थिती स्थिर आहे. असे अहवालात सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT