RBI Rules to change colored Notes in bank know details  Sakal
Personal Finance

RBI Rules: होळी खेळताना नोटांवर रंग लागलाय? रंगाच्या नोटांबाबत काय आहे RBIचा नियम?

Reserve Bank of India, Facility for Exchange of Notes: होळी खेळताना कधी कधी नोटांवर रंग लागतो आणि काही दुकानदार ती नोट स्वीकारण्यास नकार देतात. रंगीत नोटा चालणार नाहीत, अशी भीती लोकांना वाटते. जर तुमच्याकडेही रंगीत नोटा असतील किंवा कोणतीही नोट फाटली असेल तर तुम्ही बँकेत जाऊन सहज बदलून घेऊ शकता.

राहुल शेळके

Reserve Bank of India, Facility for Exchange of Notes: होळी खेळताना कधी कधी नोटांवर रंग लागतो आणि काही दुकानदार ती नोट स्वीकारण्यास नकार देतात. रंगीत नोटा चालणार नाहीत, अशी भीती लोकांना वाटते. जर तुमच्याकडेही रंगीत नोटा असतील किंवा कोणतीही नोट फाटली असेल तर तुम्ही बँकेत जाऊन सहज बदलून घेऊ शकता. कोणतीही बँक या नोटा बदलून घेण्यास नकार देऊ शकत नाही. मात्र, नोटांबाबत काही गोष्टींची काळजी न घेतल्यास तुमच्या नव्या नोटा रद्द होऊ शकतात.

3 जुलै 2017 रोजी रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी केले होते. कोणत्या नोटा बँका स्वीकारू शकतात आणि कोणत्या स्वीकारू शकत नाही याबद्दल हे परिपत्रक होते. परिपत्रकानुसार, कोणत्याही नोटेवर राजकीय घोषवाक्य लिहिलेले असल्यास ती नोट चालणार नाही.

कोणतीही बँक ती स्वीकारणार नाही. आरबीआयने आपल्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे की अशा नोटा कायदेशीर निविदा राहणार नाहीत. याचा अर्थ देशातील कोणतीही बँक अशा नोटा स्वीकारणार नाही.

रंगीत नोटांबाबत काय आहे नियम?

व्हॉट्सॲपवर एक मेसेज व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका रंगीत नोटा स्वीकारत नसल्याचे सांगण्यात येत होते. यावर रिझर्व्ह बँकेने म्हटले होते की, कोणतीही बँक या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. मात्र, यासोबतच त्यांनी लोकांना नोटा घाण करू नका, अशा सूचना दिल्या होत्या.

बँकांनी जाणूनबुजून फाडलेल्या नोटा स्वीकारू नयेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की, जाणूनबुजून फाटलेल्या नोटा ओळखणे अवघड असले तरी फाटलेल्या नोटांची नीट तपासणी केली तर ओळखता येतात.

तुमच्याकडे असलेली नोट घाण झाली असेल किंवा फाटली असेल, पण त्यावर सर्व महत्त्वाची माहिती दिसत असेल, तर बँका अशा नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत.

याबाबत आरबीआयने बँकांना निर्देश दिले आहेत. आरबीआयने बँकांना फाटलेल्या नोटा बदलून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनीही त्यांच्या शाखांमध्ये या सुविधेबाबतचे पोस्टर लावावेत अशी सूचनाही आरबीआयने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT