RBI  Sakal
Personal Finance

RBI: रिझर्व्ह बँक उद्यापासून करणार पायलट प्रोजेक्ट सुरू, कर्ज मिळणे होणार सोपे, कोणाला होणार फायदा?

RBI Pilot Project: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली

राहुल शेळके

RBI Pilot Project:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्टपासून सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म अर्थात पब्लिक टेक प्लॅटफॉर्मचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. या पब्लिक टेक प्लॅटफॉर्मद्वारे, RBI वंचित भागात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि लोकांंचा आर्थिक समावेश वाढवण्यासाठी काम करेल.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) कर्ज सहज उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तयार करत आहे.

RBI कोणत्या प्रकारचे कर्ज देईल?

आरबीआयने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर पायलट प्रकल्पादरम्यान, 1.6 लाख रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड, दूध उत्पादकांना कर्ज, एमएसएमई उद्योगांना कोणत्याही तारण न देता कर्ज देता येणार आहे. वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्ज या माध्यमातून देता येईल.

कोणत्याही अडचणीशिवाय कर्ज वितरण होणार सुलभ

रिझर्व्ह बँकेला डिजिटलच्या मदतीने कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज वितरण सुलभ करायचे आहे. यासाठी आरबीआय 17 ऑगस्ट रोजी प्रायोगिक तत्त्वावर सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे.

देशाच्या मध्यवर्ती बँकेला आशा आहे की या प्लॅटफॉर्मवर, ओपन अॅप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस (एपीआय) आणि उद्योग मानकांद्वारे, अशा लोकांना कर्ज दिले जाऊ शकते ज्यांना कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध नाही.

आरबीआयने सांगितले की, 17 ऑगस्ट रोजी हा प्लॅटफॉर्म प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला जाईल आणि या कालावधीत मिळालेल्या अनुभवांच्या आधारे कर्जदारांनाही या कक्षेत आणले जाईल.

पब्लिक टेक प्लॅटफॉर्मवर आधारच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक केवायसी, राज्य सरकारांच्या जमिनीच्या नोंदी, पॅनची वैधता, आधार ई-स्वाक्षरी आणि घर आणि मालमत्ता शोधण्याचे काम करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT