RBI Turns 90 Today PM Modi Issues Special Rs 90 Coin To Mark The Milestone
RBI Turns 90 Today PM Modi Issues Special Rs 90 Coin To Mark The Milestone Sakal
Personal Finance

RBI: पंतप्रधानांनी 90 रुपयांचे नाणे केले लाँच; खरेदी करण्यासाठी मोजावे लागतील हजारो रुपये

राहुल शेळके

RBI Issue 90 Rupees Coin: भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी देशातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) आज 90 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी 90 रुपयांचे नाणेही प्रसिद्ध केले.

भारतीय रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने 3.5 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली. RBI च्या 90 वर्षांच्या कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी RBI ची भूमिका खूप महत्वाची आहे.

आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आमची धोरणे, हेतू आणि निर्णय स्पष्ट असल्यामुळेच हा आर्थिक बदल झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमच्या प्रयत्नात सातत्य आणि प्रामाणिकपणा होता. जेव्हा हेतू स्पष्ट असतात, तेव्हा धोरणे योग्य असतात. जेव्हा धोरणे योग्य असतात तेव्हा निर्णयही योग्य असतात आणि जेव्हा निर्णय योग्य असतात तेव्हा परिणामही योग्य असतात.

रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे स्मरणार्थी नाणे जारी केले. देशात प्रथमच 90 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले आहे. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. याशिवाय यामध्ये 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. 90 रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 90 रुपये असे लिहिलेले आहे.

तसेच, त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिले आहे. त्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो आहे आणि नाण्याच्या वरच्या बाजूला हिंदीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खालच्या बाजूला इंग्रजीमध्ये लिहिलेले असेल. लोगोच्या खाली RBI @90 असे लिहिलेले आहे.

नाण्याची किती किमत आहे?

भारत सरकारने बनवलेल्या या 90 रुपयांच्या नाण्याचे वजन 40 ग्रॅम आहे जे 99.9 टक्के शुद्ध चांदीपासून बनलेले आहे. 90 रुपयांचे हे नाणे लाँच केल्यानंतर दर्शनी मूल्यापेक्षा अधिक किमतीवर विकले जाईल.

या नाण्याची अंदाजे किमत 5,200 ते 5,500 रुपये असण्याची शक्यता आहे. 19 मार्च 2024 रोजी, आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना देखील जारी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT