recession effect on it sector as number of employment drops for first time in 25 years  Sakal
Personal Finance

IT Hiring: आयटी क्षेत्र मंदीच्या छायेत? 25 वर्षांत पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या संख्येत झाली घसरण

IT Hiring: वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 2.12 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.

राहुल शेळके

IT Hiring: 2023 हे वर्ष संपत आले आहे. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत जगभरात नोकर कपातीचे संकट निर्माण झाले होते. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, जगातील 2.12 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था आर्थिक मंदीतून जात आहेत. त्याचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे. जगासोबतच भारतावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.

भारतातील 10 आघाडीच्या आयटी कंपन्या, ज्यात 20 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये घट होत आहे. लाइव्ह मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर 2023 या नऊ महिन्यांत सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या संख्येत घट झाली आहे.

आयटी तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबर ते मार्च हा साधारणपणे आयटी क्षेत्रात कमी कामाचा कालावधी असतो, परंतु जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत नोकऱ्या कमी होणे हे भारतीय आयटी क्षेत्रात मंदीचे संकेत आहेत.

मिंट या इंग्रजी न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, देशातील 10 आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या आकडेवारीवरून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस इत्यादी मोठ्या आयटी कंपन्यांसह अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला देशातील आघाडीच्या 10 आयटी कंपन्या 21.10 लाख कर्मचार्‍यांना रोजगार देत होत्या, मात्र सप्टेंबरपर्यंत त्या 20.60 लाखांवर आल्या आहेत.

25 वर्षात प्रथमच कामगारांची संख्या कमी झाली

गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड इत्यादी आयटी कंपन्यांमध्ये गेल्या 9 महिन्यांत 51,744 नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि युरोपमधील मंदीमुळे भारतीय आयटी क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT