Gold Price Sakal
Personal Finance

Gold Price: जळगावमध्ये सोन्याच्या दरात रेकॉर्ड ब्रेक तेजी; एका दिवसात 700 रुपयांची मोठी वाढ; जाणून घ्या प्रतितोळा दर

सध्या अक्षय्य तृतीया तोंंडावर असल्यामुळे सोने चांदीच्या खरेदीकडे सर्वांचा कल आहे.

राहुल शेळके

Gold Price Hike: गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. आज मात्र सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सध्या अक्षय्य तृतीया तोंंडावर असल्यामुळे सोने चांदीच्या खरेदीकडे सर्वांचा कल आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत विशेषतः विकसित देशांमध्ये मंदीचा धोका वाढत आहे. त्यामुळेच सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढले असून त्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे.

भारतात लग्नाचा हंगाम मार्च-एप्रिलपासून सुरू होतो जो दिवाळीपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालतो. किंमत निश्चितच जास्त आहे, परंतु मागणीतही तेजी दिसून येत आहे. जळगावात सोन्याच्या किंमतींने 63 हजारांवर उसळी घेतली आहे.

त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.  सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. सोन्याचे भाव  63300  रुपयांवर पोहचले आहेत. 

सणासुदीच्या मागणीमुळे किंमतीत वाढ होत आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. तेथेही सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. बँकिंग संकटामुळे फेडरल रिझर्व्हची भूमिका मवाळ होत आहे.

त्यामुळे डॉलर कमजोर होत असून सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकाही मोठ्या प्रमाणावर भौतिक सोन्याची खरेदी करत आहेत. बँकिंग संकटामुळे मंदीचे संकट अधिक गडद होत आहे. या सर्व बाबींमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे.

सोने का महाग होत आहे?

  • भारत, चीनसह जगभरातील केंद्रीय बँका सातत्याने सोन्याची खरेदी करत आहेत

  • शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात

  • देशात पुन्हा एकदा दागिन्यांची मागणी वाढली आहे

  • गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वेगाने वाढत आहे

  • उच्च चलनवाढ आणि मंदावलेली आर्थिक वाढ यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे

  • जागतिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदार सोन्याला पसंती देत ​​आहेत

भारतात आगामी काळात येत असलेले सण आणि लग्नसराई यामुळे मोठी मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचं सोने व्यावसायिक सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यातील दरी पूल परिसरात पहाटे भीषण अपघात , चार वाहने एकमेकांना धडकली अन्...

UP News : ‘फरसा वाले बाबा’ मृत्यू प्रकरण: अपघात की घातपात? मथुरेत हायवेवर राडा, CM योगी आदित्यनाथ यांचा कडक इशारा

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Nanded News: नांदेडमध्ये दुचाकीचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

SCROLL FOR NEXT